मुंबई लोकल चा आज मेगाब्लॉक अनेक मार्गावरील सेवा बंद.
हार्बर आणि पश्चिम रेल्वेमार्गावर रविवारी मेगाब्लॉक, मध्य रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक नाही

✒️निलम खरात प्रतीनिधी✒️
मुंबई :- आज मुंबई लोकल ट्रेनच्या विविध अभियांत्रिकी व देखभाल कामांसाठी पश्चिम, हार्बर आणि ट्रान्सहार्बर विभागात आज, रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लाॅक नसल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
हार्बर मार्गावर कुर्ला – वाशी अप व डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून सकाळी 10.34 ते दुपारी 3.39 दरम्यान वाशी / बेलापूर / पनवेलसाठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा व तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबईसाठी पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी 10.21 ते दुपारी 3.41 दरम्यान सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. ब्लॉक काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कुर्ला आणि वाशी – पनवेल विभागादरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.
ट्रान्सहार्बर मार्गावर ठाणे-वाशी / नेरुळ अप व डाऊन लाईनवर सकाळी 11.10 ते संध्याकाळी 4.10 यावेळेत मेगाब्लॉक असेल. ठाणे येथून सकाळी 10.35 ते सायंकाळी 4.19दरम्यान वाशी / नेरुळ / पनवेलकरिता सुटणाऱ्या सेवा आणि सकाळी 10.12 ते सायंकाळी 4.09 यावेळेत पनवेल / नेरूळ / वाशी येथून ठाणेकरिता सुटणाऱ्या अप सेवा बंद राहतील.
पश्चिम रेल्वे मार्गावर 10.35 ते 15.35 यावेळेत मरिन लाईन्स ते माहीम स्थानकादरम्यान डाऊन धीम्या मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. याकाळात मरिन लाईन्स ते माहीम स्थानकादरम्यान सर्व जलद गाड्या धीम्या मार्गावर चालविण्यात येतील.