Nagpur police and a revenue officer commit suicide in Mumbai after getting fed up with their girlfriend.
Nagpur police and a revenue officer commit suicide in Mumbai after getting fed up with their girlfriend.

नागपूर पोलीस आणि प्रेमीकेच्या त्रासाला कंटाळून महसूल अधिकाऱ्याने केली मुंबईत आत्महत्या.

 प्रेयसी आणि पोलिसांनी संगनमत करून लाखोंची खंडणी उकळल्यानंतर प्रचंड मानसिक त्रास दिल्यामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या महसूल विभागातील एका अधिकाऱ्याने आत्महत्या केली. मृत्युपूर्वी त्याने ब्लॅकमेलर प्रेयसी आणि खंडणीबाज  पोलिसांच्या पापाचा पाढा लिहून ठेवल्याने ठाणे जिल्हा पोलिसांनी नागपुरातील तीन पोलीस अधिकाऱ्यांसह 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यातील एका पीएसआयला अटक केली आहे. 

 Nagpur police and a revenue officer commit suicide in Mumbai after getting fed up with their girlfriend.

✒युवराज मेश्राम नागपुर प्रतिनिधी✒
नागपूर/मुंबई,दि 13 मार्च:- नागपूर पोलीस आणि प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून महसूल विभागातील एका अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याची खळबळजनक बातमी समोर आली आहे. या आत्महत्या प्रकरणात तीन पोलिस अधिकाऱ्यांसह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आत्महत्या करणा-यां महसूल विभागातील अधिकाऱ्यानी आत्महत्येपूर्वी त्याच्यासोबत झालेला प्रकार एका चिठ्ठीत लिहून ठेवल्याने हा सर्व धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

मूळचे पुण्यात रहणारे सचिन चोखोबा साबळे वय 38 वर्ष हे मुंबईला बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत होते. येथेच त्यांचे सुत नीता मानकर खेडकर हिच्याशी जुळले आणि त्यांच्यामध्ये परस्पर सहमतीने शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. हे सर्व प्रकरण माहिती झाल्याने एसटी महामंडळामध्ये ड्रायव्हर असलेल्या निताच्या पतीने डिसेंबर 2020 मध्ये आत्महत्या केली होती. याप्रकरणात यशोधरा नगर पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. संबंधित प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक चव्हाण याच्याकडे होता. त्याने नीताशी बोलून या प्रकरणात साबळे या अधिकाऱ्याला तुमच्यामुळे नीताच्या पतीने आत्महत्या केली आहे आणि तुम्ही आरोपी आहात असं सांगायला सुरुवात केली. त्यानंतर जर हे सर्व प्रकरण दाबायचं असेल तर 4 लाख 50 हजार रुपये द्या असं सांगितलं.

चव्हाणच्या एका नातेवाईकाने मुंबईला जाऊन चव्हाणच्या सांगण्यावरून सचिन साबळे यांच्याकडून विविध कारणं सांगुन एकत्रित 9 लाख 50 हजार खंडणी वसूल केली. विविध कारणे देऊन पोलिस सचिनला त्रास देत असताना नीता, तिची मुलगी आणि भाऊ सचिनला लग्न करण्यासाठी धमकीचे फोन करत होते. या सर्व गोष्टीमुळे कंटाळलेल्या सचिन यांनी 18 मार्चला एक चिठ्ठी लिहून आणि त्यामध्ये घडलेला सर्व प्रकार लिहून आपली जिवनयात्रा संपवली.

सचिन साबळे आत्महत्या प्रकरणात ठाणे पोलिसांनी नीता मानकर, तिची मुलगी आणि भाऊ दादा मानकर यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक दीपक चव्हाण वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमाकांत दुर्गे आणि मेश्राम नावाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यापैकी पोलीस उपनिरीक्षक दीपक चव्हाण याला ठाणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दीपक चव्हाणला याप्रकरणी निलंबित केलं असून इतर अधिकाऱ्यांवरही कारवाई होणार असल्याचं आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्टं केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here