ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन ( AISF Girls Wing ) भंडारा द्वारे विद्यार्थिनी युवतींचा मुक्त संवाद
✍ भवन लिल्हारे ✍
* भंडारा उपजिल्हा प्रतिनिधी *
📱 ८३०८७२६८५५ 📱
📞 ८७९९८४०८३८ 📞
मोहाडी :- भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात आज दिनांक १० मार्च २०२२ रोज गुरुवार ला ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन ( AISF Girls Wing ) द्वारा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त व जागतिक महिला दिनानिमित्त विद्यार्थिनी – युवतींचा मेळावा व मुक्त संवाद कार्यक्रम स्थानिक पातळीवर एन.जे.पटेल महाविद्यालय मोहाडी येथे आयोजित करण्यात आला होता.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सौ. सुषमा बनसोड, महिला समुपदेशक पोलीस मुख्यालय भंडारा, वैशाली सतदेवे समुपदेशक चाईल्ड हेल्प लाईन भंडारा व कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. पांडे मॅडम यांनी भुषविले . सुषमा बनसोड मॅडम यांनी महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटना, कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना त्याबदद्ल कार्यवाही, सरकार व द्वारा राबविण्यात येणारे योजना व टोल फ्री क्रमांक 1091 या बददल माहिती दिली. वैशाली सतदेवे मॅडम यांनी 0 ते 18 वयोगट या अत्याचार, शोषन, बाललैगिक कायदा त्यावरील उपाय योजना व समुपदेशन या विषयी माहिती दिली. तर नेहमी लग्न करुन मुलिंनाच सासरला का जावं लागते? मुलींना स्वताचा जिवनसाथी निवडण्यासाठी समाज संधी कधी देईल? त्यासाठी काय करावं लागेल? लग्नाच्या जोड्यात मुली नेहमी डाव्या बाजुला का राहतात? असे असंख्य विचार करायला लावणारे प्रश्न यावेळी मुलींना उपस्थीत केले.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रा. राऊत मॅडम, प्रा. डाकरे मॅडम, प्रा. भैसारे सर, प्रा. जाधव सर, प्रा. डॉ. वरखडे सर, कॉम्रेड वैभव चोपकर ( अध्यक्ष A I S F मोहाडी ) कॉम्रेड मिनाक्षी मेहर ( सचिव AISF मोहाडी ) कॉम्रेड प्रेरणा सिंगनजुडे ( A I S F तुमसर ) योच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थिनी, विध्यार्थी उपस्थित होत्या.