काँग्रेस चे सुत्र पुन्हा सोनिया गांधी यांच्या हाती 

काँग्रेस चे सुत्र पुन्हा सोनिया गांधी यांच्या हाती 

काँग्रेस चे सुत्र पुन्हा सोनिया गांधी यांच्या हाती 

✍ भवन लिल्हारे ✍
* भंडारा उपजिल्हा प्रतिनिधी *
📱 ८३०८७२६८५५ 📱
📞 ८७९९८४०८३८ 📞

न्यू दिल्ली :- आज दिनांक १३ मार्च २०२२ रोज रविवारला दिल्ली येथे काँग्रेस पार्टी कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली, या बैठकीत सोनिया गांधी, प्रियंका गांधी, राहुल गांधी, व इतर काँग्रेसचे दिग्गज नेते उपस्थित होते, जवळपास चार तास चाललेल्या बैठकीत पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकाही ठिकाणी काँग्रेस ला यश मिळाले नाही, या विषयावर चर्चा रंगली, यात उलटपक्षी पंजाब मध्ये असणारी सत्ता सुद्धा ” आप ” कडे निघून गेली. या चर्चा बैठक मध्ये विविध विषयावर चर्चा करण्यात आली. सोनिया गांधी यांनी हार कबुली केली असता, त्यांनी आपली राजीनामा देण्याची तयारी दर्शवली, मात्र सोनिया गांधी यांचा राजीनामा काँग्रेस कमिटीच्या दिग्गज पदाधिकाऱ्यांनी फेटाळली. सोनिया गांधी यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवल्यावर काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद, अजय माकन आणि आनंद शर्मा यांनी एक पाऊल मागे घेत, येत्या काळात काँग्रेस पक्ष देश पातळीवर चिंतन शिबिर घेणार, इतकाच नाही तर राहुल गांधी यांनी सक्रिय व्हावे, असा सूर या बैठकीत उमतल्याची माहिती काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी यांच्या मुखातून निघाली, आणि काँग्रेस पक्षाची सगळी सुत्र पुन्हा सोनिया गांधी यांच्या कडेच राहील. आणि आम्ही काँग्रेस पक्षाच्या पाठीशी आहोत, अशी माहिती काँग्रेसच्या सूत्रांकडून मिळाली आहे.
आमचा सल्ला या पक्षाच्या भल्यासाठी आहे, आम्हाला विरोधक किंवा शत्रू समजले जाऊ नये, असे म्हटले, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव केसी वेणुगोपाल यांनी काँग्रेस कार्यकारिणीने सर्वानुमते सोनिया गांधी यांनीच अध्यक्ष पदी राहावं असा निर्णय घेण्यात आला. आणि काँग्रेस पक्ष चिंतन शिबिराचे आयोजन करेल, अशी माहितीही काँग्रेस सूत्रांकडून सांगण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here