माणगांवमध्ये दिवसाढवळ्या चोरांचा सुळसुळाट, सहा घरात चोरी करून चोर पसार 

सचिन पवार 

रायगड ब्युरो चीफ

मो: 8080092301

रायगड:-माणगांव तालुक्यातील माणगांव येथील कचेरी रोड येथील ग्रीन पार्क तर मुबंई गोवा हायवे वरील कुणाल डेकोरी साई सागर बिल्डिंग तिसरा मजला येते अज्ञात चोरट्यानी आज दि.१३ मार्च रोजी दुपारी १२ ते 2 च्या दरम्यान घरात कोण नसल्याचा गैरफायदा घेत ६ घरात घुसून घरातील रोख रक्कम घेऊन पोबारा केला. हे अज्ञात इसम नक्की कोण यांचा खुलासा अद्याप अस्पष्ट झालं नाही.

कचेरी रोड येथील राहणारे दत्ताराम बक्कम यांच्या राहत्या घरी अज्ञात इमामांनी घराचे लॉक तोडून आत प्रवास करून घरात असणाऱ्या गोदरेज कपाटातून रोख रक्कम 1.लाख 25 हजार रुपये घेऊन पोबारा केला तसेच माणगांव गोवा रोड येथील एम आर एफ टायर समोरील कुणाल डेकोरी येथील दुसरा माला येथील राहणारे चार रुमचे दरवाच्याच्या लॉक थोडुन गोदरेज कपाटातून रोख रक्कम 45 हजार तसेच चांदीचे मूर्ती, कानातील सोन्याचे रिंग, मुलाच्या गळ्यातील दोन सोन्याचे लॉकेट असे एकूण 65 हजार पलवले त्याच प्रमाणे छोट्या मुलाचे रोजचे ठेवणारे पैश्याचे मनी डब्बा फोडून त्याच्यात असणारे पैसे सुद्धा घेऊन पोबारा केला.

माणगांव बाजारपेठेत भर दुपारी वेगवेगळ्या ६ घरात घुसून घरातील रोख रक्कम घेऊन पोबारा केला. हे अज्ञात इसम नक्की कोण यांचा खुलासा अद्याप स्पष्ट झालं नाही.कचेरी रोड येथील राहणारे दत्ताराम बक्कम यांच्या राहत्या घरी अज्ञात इमामांनी घराचे लॉक तोडून आत प्रवास करून घरात असणाऱ्या गोदरेज कपाटातून रोख रक्कम 1.लाख 25 हजार रुपये घेऊन पोबारा केला तसेच माणगांव गोवा रोड येथील एम आर एफ समोरील कुणाल डेकोरी साई सागर येथील तिसरा माला येथील राहणारे चार रुमचे दरवाच्याच्या लॉक थोडुन गोदरेज कपाटातून रोख रक्कम 50 हजार तसेच चांदीचे मूर्ती पलवली त्याच प्रमाणे छोट्या मुलाचे रोजचे ठेवणारे पैश्याचे मनी डब्बा फोडून त्याच्यात असणारे पैसे सुद्धा पळवून नेले.

या अज्ञात इसमावर कॉ. गु. रजि. नं कलम 66/2023 भा. द. वि. कलम 454.380 नुसार माणगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.माणगांव पोलीस ठाण्याचे माणगांव पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनखाली पुढील तपास सह पोलीस निरीक्षक मोहिते, सह पोलीस निरीक्षक आस्वर, सह फौंज. मगर हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here