बामनी प्रोटीन्स लिमिटेडला तात्काळ बंद करण्याचे निर्देश • राजेश बेले यांच्या प्रयत्नांना यश • महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे कारवाई

बामनी प्रोटीन्स लिमिटेडला तात्काळ बंद करण्याचे निर्देश

• राजेश बेले यांच्या प्रयत्नांना यश
• महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे कारवाई

बामनी प्रोटीन्स लिमिटेडला तात्काळ बंद करण्याचे निर्देश • राजेश बेले यांच्या प्रयत्नांना यश • महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे कारवाई

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा

चंद्रपूर : 14 मार्च
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने बामनी प्रोटीन्स लिमिटेडला जल आणि वायू प्रदूषण नियंत्रण कायद्यांचे उल्लंघन केल्याबद्दल तात्काळ बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजेश बेले यांनी दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.

कंपनी कमी दर्जाचे सांडपाणी कंपनीच्या आवाराबाहेर सोडत आहे. एमपीसीबी अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासात असे आढळून आले की कंपनीने सांडपाणी टाकण्यासाठी पाइपलाइन टाकली होती आणि हे सांडपाणी नाल्यात सोडले जात होते. कंपनीने एमपीसीबीच्या निर्देशांचे पालन केले नाही आणि प्रदूषण नियंत्रण उपकरणे बसवली नाहीत, अशी तक्रार देण्यात आली.

त्यानुसार एमपीसीबीने 7 मार्च रोजी कंपनीला प्रस्तावित निर्देश जारी केले. कंपनीने 11 मार्च रोजी उत्तर दिले, परंतु ते एमपीसीबीला समाधानकारक वाटले नाही. एमपीसीबीने 13 मार्च रोजी कंपनीला तात्काळ बंद करण्याचे निर्देश जारी केले. कंपनीने एमपीसीबीच्या निर्देशांचे पालन केले नाही तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. एमपीसीबीने वीज वितरण कंपनीला या कंपनीचा वीजपुरवठा खंडित करण्याचे निर्देश दिले आहेत. एमपीसीबीने उपप्रादेशिक अधिकारी यांना वरील निर्देशांचे पालन सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here