शिवसेना पक्षाच्या वतीने बूथ प्रमुख शिवदूत व शिव सैनिकांचा मेळावा संपन्न

शिवसेना पक्षाच्या वतीने बूथ प्रमुख शिवदूत व शिव सैनिकांचा मेळावा संपन्न

शिवसेना पक्षाच्या वतीने बूथ प्रमुख शिवदूत व शिव सैनिकांचा मेळावा संपन्न

त्रिशा राऊत नागपूर ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी मो
9096817953

भिवापूर :- भिवापूर. शिवसेना शिंदे गटाच्या वतीने बूथ प्रमुख , शिवदुत शिवसैनिकांचा मेळाव्याचे आयोजन आज दिनांक 14 मार्चला दुपारी 2 वाजता करण्यात आले होते. या कार्यक्रमाला खासदार कृपाल तुमाने यांची उपस्थिती होती. विशाल सभागृहात आयोजित कार्यक्रमाला अतिथी म्हणून शिवसेना जिल्हाध्यक्ष संदीप इतकेलवार ,जिल्हा सहसंपर्कप्रमुख चंद्रहास राऊत , जिल्हा युवा सेना सचिव शुभम नवले ,भिवापूर तालुकाप्रमुख रूपराव गिरडे ,शहर प्रमुख महेश डडमल , महिला तालुकाप्रमुख रीना ताई बांडेबुचे ,शहर अध्यक्ष मंगलाताई मंगर,अलका गुप्ता ,नांद सरपंच शितल राजूरकर ,उपस्थित होते. प्रारंभी खासदार कृपाल तूमाने छत्रपती शिवाजी महाराज व हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण दीप प्रज्वलन केले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकार काळात विकासाच्या अनेक योजना नागरिकांसाठी राबविण्यात येत असून खासदार निधीच्या माध्यमातून विकासाचे कामे होत असल्याचे प्रतिपादन रामटेक लोकसभेचे क्षेत्राचे खासदार कृपाल तुफानी यांनी व्यक्त करून यावेळी शिवसेना पक्षाचा विचार व काम पदाधिकारी व कार्यकर्ते यांना सामान्य जनतेपर्यंत पोहचवा याबाबत मार्गदर्शन करून त्यावेळी शिवसेना जिल्हा अध्यक्ष नागपूर ग्रामीण संदीप इटकेलवार यांनीही बूथ प्रमुख, शिवदूत कार्यकर्त्यांना पक्ष संघटन बळकट करण्याविषयी माहिती देऊन नागपूर जिल्ह्याचा आरोग्य शिबीर माध्यमातून आरोग्य सेवेचा लाभ नागरिकांना करून दिल्याचे यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे संचालक व आभार तालुकाप्रमुख रूपराव गिरडे मांडले.यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी ,कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समीर भागवत ,घनश्याम खवास ,मनोज शेटे ,दिलीप लांजेवार, शालू ताई मेश्राम, मनीषा बावणे, रज्जु श्रीरामे यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here