कर्जत मध्ये शेतकरी कामगार पक्षाला मोठे खिंडार …राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकाप सह काही ग्रामपंचायत सदस्य यांचा भाजपात प्रवेश

कर्जत मध्ये शेतकरी कामगार पक्षाला मोठे खिंडार ...राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकाप सह काही ग्रामपंचायत सदस्य यांचा भाजपात प्रवेश

कर्जत मध्ये शेतकरी कामगार पक्षाला मोठे खिंडार …राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकाप सह काही ग्रामपंचायत सदस्य यांचा भाजपात प्रवेश

कर्जत मध्ये शेतकरी कामगार पक्षाला मोठे खिंडार ...राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकाप सह काही ग्रामपंचायत सदस्य यांचा भाजपात प्रवेश

✒️संदेश साळुंके
कर्जत रायगड प्रतिनिधी
📞9011199333

कर्जत;- कर्जत तालुका शेतकरी कामगार पक्षाचे पुरोगामी युवक संघटनेचे तालुका अध्यक्ष वैभव भगत तसेच उमरोली जिल्हा परिषद गटाचे विभाग अध्यक्ष रामदास शेलार तसेच काही ग्रामपंचायत सदस्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर आणि उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला असून शेतकरी कामगार पक्षासाठी मोठा झटका समजला जात आहे.

भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून होत असलेल्या विकासकामांवर प्रभावित होऊन अनेक पक्षांचे नेते विकासाचे ‘कमळ’ हाती घेत आहेत.तसेच भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यशैलीवर प्रभावित होऊन तसेच कर्जत मंडल अध्यक्ष राजेश भगत यांच्या नेतृत्वाखाली कर्जतमधील विविध पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.त्यात कर्जत तालुक्यातील चिंचवली येथील कार्यकर्ते नितेश पांडुरंग भगत,शेकापचे उमरोली जिल्हा परिषद गटाचे अध्यक्ष रामदास शेलार,पुरोगामी युवक संघटनेचे तालुका अध्यक्ष आणि नेरळ विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक वैभव भगत, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका सरचिटणीस रवींद्र चव्हाण, शेकापचे मनीष ठाणगे, चिंचवली ग्रामपंचायतीच्या माजी उपसरपंच जोत्स्ना भगत, पुरोगामी युवक संघटनेचे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष राजेश नाईक, शेकाप कार्यकर्ते सुरज भगत आणि चरणदास भगत यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. पनवेल मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमास भाजप उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, दीपक बेहेरे, कर्जत मंडल अध्यक्ष राजेश भगत, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, महिला मोर्चा अध्यक्ष नम्रता कांदळगावकर, कर्जत विधानसभा विस्तारक हेमंत नांदे, उपसरपंच सुप्रिया भगत, जिल्हा परिषद विभागीय उपाध्यक्ष विनोद भगत, दिनेश राठोड आदी उपस्थित होते.