जिल्हा उद्योग केंद्रामार्फत एक दिवशीय कार्यशाळा संपन्न;

जिल्हा उद्योग केंद्रामार्फत एक दिवशीय कार्यशाळा संपन्न;
व्यवसाय, वित्त आणि शाश्वतता विषयावर मार्गदर्शन

✍️अनिता हातेकर✍️
संग्रामपूर तालुका प्रतिनिधी
मो 8459775380

बुलडाणा : सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या वाढीसाठी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चर पुणे तसेच जिल्हा उद्योग केंद्र यांचे संयुक्त विद्यमाने व्यवसाय, वित्त आणि शाश्वतता या विषयावर एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन येथील नर्मदा हॉलिडेजमध्ये करण्यात आले. यावेळी शासनाच्या विविध योजना, रोख प्रवाह व्यवस्थापन, पतशिस्त, हरित ऊर्जा व्यवसायातील कचरा नियंत्रण, शाश्वत वाढ, व्यवसायातील आर्थिक व्यवस्थापन आदी विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक प्रमोद लांडे यांनी जिल्हा उद्योग केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनेची माहिती दिली. व्यवस्थापक सुनिल पाटील यांनी मैत्री पोर्टल 2.0 वर सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच आर्थिक सल्लागार श्री.पेडणेकर यांनी रोख प्रवाह व्यवस्थापन, पतशिस्त, हरित ऊर्जा व्यवसायातील कचरा नियंत्रण, शाश्वत वाढ, व्यवसायातील आर्थिक व्यवस्थापन तसेच व्यवसाय वाढीसाठी करावयाचे उपाययोजनाबाबत मार्गदर्शन केले.

व्यवसायामध्ये वस्तू अथवा सेवा विकून नफा कमावल्या जातो. अशा पारंपारिक विचारसरणीच्या पुढे जाऊन, अजून जास्त नफा कसा कमवावा, याबाबत वित्तीय मार्गदर्शन, जीएसटी विषयक सल्ला, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग, आयात-निर्यातीची माहिती अशा विविध विषयावर कार्यशाळेमध्ये तज्ज्ञांव्दारे मार्गदर्शन करण्यात आले. तसेच उपस्थिताव्दारे विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे निराकरण करण्यात आले. या कार्यशाळेत जिह्यातील उद्यम नोंदणीकृत एमएसएमई उद्योजक, औद्योगीक संघटना पदाधिकारी, एफपीओ मोठ्या संख्येने उपस्थित होते.