धुलिवंदनानिमित्त मटणाच्या दुकानात प्रचंड गर्दी, नागरिकांची मटणाला जास्त पसंदी.

धुलिवंदनानिमित्त मटणाच्या दुकानात प्रचंड गर्दी, नागरिकांची मटणाला जास्त पसंदी.

✍️ पप्पू वि. नायर ✍️
मुंबई शहर प्रतिनिधी
मो :- 7304654862

मुंबई :- गोरेगाव पश्चिम मधे धुलिवंदन सणा निमित्त गोरेगावकरांनी सकाळी 4 वाजल्यापासून मटणाच्या दुकानात रांग लावताना दिसून आले. काल होळी चा सण असल्याने घरामध्ये पुरणपोळी पोळीचा गोड सण साजरा करून, दुसऱ्या दिवशी धुलिवंदन सण उजाडत गोरेगावकरांनी जणू मटणाचा बेत अखला असावा, असे चित्र आज मटणाच्या दुकानात पहाटे लागलेल्या रांगेवरून दिसण्यात आले.

कारण आदल्या दिवशी होळीचा गोड सण करून दुसऱ्या दिवशी प्रत्येक नागरिक आवडीनुसार चिकन, मच्छि, मटण, घरी आणून तिखट सण धुलिवंदनाच्या दिवशी करत असतो, पण यंदा मच्ची, चिकन कडे पाठ फिरवताना दिसून आले.

कारण सकाळी पहाटेपासून नागरिकांनी मटणाच्या दुकानात तोबा गर्दी करतानाचे चित्र आज धुलिवंदनाच्या दिवशी करताना दिसलें. त्याचे कारण महाराष्ट्रात राहणारे मराठी बांधव होळी चे पुरणाचे गोड सण साजरे करून दुसऱ्या दिवशी, तिखट मटण वड्याचे सण पाहुणे मंडळी बोलावून परंपरेपासून घरात करतात, आणि त्याच निमित्ताने आजही नागरिकांनी मटणाच्या दुकानात गर्दी करून मटण वड्यांचे सण मोठ्या उत्साहत साजरा केला.