गोरगांव पश्चिम मधे, धुलिवंदनाच्या निमित्ताने पोलिसांचा तगडा बंदोबस्त.
✍️ पप्पू वि. नायर ✍️
मुंबई शहर प्रतिनिधी
मो :- 7304654862
मुंबई :- गोरेगांव पश्चिम मधे एस व्ही रोड, लिंक रोड व अन्य ठिक – ठिकाणी धुलिवंदन व रमजान निमित्ताने अनुचित प्रकार घडू नये म्हणून तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला.
मुंबई पोलिसांनी धुलिवंदनासाठी विशेष नियमावली जाहीर केली होती. त्याच निमित्ताने पोलिसांचा फोज फाटा ठिक -ठिकाणी लावण्यात आला होता. तर नवीन नियमावली अशी होती कि, अनोळखी व्यक्तींना रंग लावल्यास कारवाई होणार, अश्लील गाणी डीजे वर लावल्यास कारवाई होणार, आणि जबरदस्तीने वर्गणी मागणाऱ्यांवर पण कारवाई केली जाईल, अशी नवीन विशेष नियमावली लावण्यात आली असून पोलीस प्रशासन विविध ठिकाणी अलर्ट झालेले दिसून आले.
तसेच तळीरामनवर पोलिसांची करडी नजर होती, हुल्लड बाजी करणारे तरुणानवर पोलिसांचा वचक बसावा यासाठी पोलीस सर्वत्र उभे असलेले पाहायला मिळाले. कुठलीही घटना समाज कंटाकांकडून घडू नये म्हणून विशेष काळजी पोलीस प्रशासनाकडून घेण्यात आल्याचे दिसून आले.
तसेच मद्ध प्राशन करून वाहन चालवणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यात आली. त्यासाठी पोलिसांनी गोरेगांव एस व्ही रोड, लिंक रोड व अन्य महत्वाच्या ठिकाणी नाके बंदी करण्यात आली होती. कायदा व सुव्यवस्था निर्माण होऊ नये म्हणून पोलीस अलर्ट मोड वर दिसून आले.