राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था अध्यक्षांचे कौतुक
उज्ज्वला चंदनशिव चव्हाण यांना नाशिक येथे स्वयंसिद्धा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान.
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ नाशिक यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्ताने आयोजित भव्य दिव्य अशा कार्यक्रमात नाशिक येथे बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघातर्फे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. महेंद्र देशपांडे यांच्या हस्ते उज्ज्वला चंदनशिव यांना राष्ट्रीय स्वयंसिद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी मनपा नाशिक आयुक्त मनिषा खत्री, आयएएस अधिकारी लीना बनसोड, प्रगती गृहउद्योग संचालिका पूजा कदम, शिखर स्वामिनी अध्यक्षा संगीता गायकवाड इ मान्यवर उपस्थित होते. हा राष्ट्रीय पुरस्कार वितरण समारंभ नाशिक येथील रोटरी सभागृह येथे संपन्न झाला.
सामाजिक कार्यकर्ती तसेच उज्ज्वल भविष्य सेवाभावी संस्था अलिबाग रायगड अध्यक्षा उज्ज्वला चंदनशिव यांनी सामाजिक कार्यात उल्लेखनीय कार्य करीत असताना समाजातील गरीब गरजू, दिव्यांग तसेच घरच्यांनी दुर्लक्ष केलेल्या महिलांना दरमहा विविध दात्यांच्या सहकार्याने राशन देण्याचे कार्य त्या आपल्या उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था तसेच तेजस्विनी फाऊंडेशन माणुसकीच्या माध्यमातून करीत आहेत.
रस्त्यावरील बेवारस फिरणाऱ्या पाळीव प्राण्यांच्या पायावरून गाडी, किव्हा जखमी प्राण्यांना डॉक्टर्स च्या सल्याने औषधोपचार करीत असतात.
गेली कित्येक वर्षांपासून रस्त्यावर फिरणाऱ्या कुत्र्याची नसबंदी,तसेच एक नंदी नावाच्या बैलाला त्यांनी तीन वर्ष त्याची सेवा केली त्याच्या पायावरून गाडी गेल्याने त्याला चालता येत नव्हते
तो जिथे जाईल तिथे त्या नंदी साठी तीन टाइम त्याचा चारा, पाणी आणि औषधं खाऊ घालून त्याला बरं केल आहे. आज ही हा नंदी अलिबाग शहरात फिरताना दिसतो. अशा मुक्या प्राण्याच्या सेवेसाठी त्या तत्परतेने धावत जात असतात. अलिबाग पोलिस ठाण्यात त्या ड्रिल इन्स्ट्रक्टर या पदावर कार्यरत असून मुळातच सामाजिक कार्यात आवड असणाऱ्या उज्ज्वला चंदनशिव या सध्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे शाखा खारघर येथे प्राध्यापिका स्मिता वारगे यांच्या मार्गदर्शनाखाली एम.एस.डब्ल्यू, (मास्टर ऑफ सोशल वर्क) या द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहेत. त्यांच्या याच कार्याची दखल घेत बाळशास्त्री पत्रकार संघ नाशिक यांच्या वतीने त्यांना राष्ट्रीय स्वयंसिद्धा पुरस्कार २०२५ सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला आहे.
उज्वल भविष्य सामाजिक संस्थेकडून तेजस्विनी फाउंडेशनचे अध्यक्षा जीविता पाटील व उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था अध्यक्षा उज्ज्वला चंदनशिव यांचे कौतुक करण्यात आले.
उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था प्रमुख सल्लागार डॉ नितीन गांधी व माणुसकी प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ राजाराम हुलवान यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी डॉ सागर गवळी, डॉ आणण पाटील, डॉ राकेश सिंह, डॉ करण वाघमारे, राजन पाटील ,उज्ज्वल कर्मचारी , अधिकारी उपस्थित होते.
