मौजा आंबागड येथील एफपीओला आंतरराष्ट्रीय मास्टरकार्ड टिमने दिली भेट

मौजा आंबागड येथील एफपीओला आंतरराष्ट्रीय मास्टरकार्ड टिमने दिली भेट

मौजा आंबागड येथील एफपीओला आंतरराष्ट्रीय मास्टरकार्ड टिमने दिली भेट

✍ भवन लिल्हारे ✍
भंडारा उपजिल्हा प्रतिनिधी
मीडिया वार्ता न्युज
8308726855,8799840838

तुमसर :- भंडारा जिल्हा तुमसर तालुक्यातील मौजा आंबागड येथे दिनांक १२ एप्रिल २०२२ रोज मंगळवारला आंबागड फार्मर प्रोडूसर कंपनी ली. आंबागड मौजा दावेझरी गट क्र. १४१ येथे ग्रामिण फाऊंडेशन व आंतरराष्ट्रीय मास्टर कार्डचे टीम ‘ मृगण राजा ‘ ( मास्टर कार्ड ) यु एस ए मिस तारा ( ग्रामिण ग्लोबल ) यु एस ए प्रभात लाभ सीईओ ग्रामिण फाऊंडेशन इंडिया, गौरव चक्रवर्ती ( सी ओ ग्रामिण फाऊंडेशन ) अरब्धा दास ( डीस्ट प्रो. ग्रामिण फाऊंडेशन ) पवन कटियाला ( डायरेक्टर गिव ) आशिष सुतार ( मॅनेजर ) अमरेश पांडे ( रिजी ओनल मॅनेजर यु पी बिहार ) अनिकेत किर्ती ( प्रो. मॅनेजर ) यांनी सुरु असलेल्या प्रत्येक उपक्रमाची सविस्तर माहिती घेऊन कंपनीच्या अडीअडचनी समजून घेतल्या
कंपनी मार्फत सुरु असलेले उपक्रम १) बायोप्रोम २) गांडूळ खत ३) सेंन्द्रीय खत उत्पादन ४) शासकिय आधारभूत चना खरेदी केंन्द्र ५) टमाटर प्रक्रिया उद्योग ६) ए वन सेंटर ७) सी एस सी सेंटर ८) शेतकरी प्रशिक्षण ९) बँकिंग १०) इरेसा युनिटची पाहणी केली. व कंपनीच्या ब्रीद वाक्य ” शेतकऱ्याच्या हितार्थ सदैव तत्पर ” या आधारावर उत्पादीत माला ला आंतराराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करण्याच्या हेतूने मास्टर कार्डच्या माध्यमाने सहकार्य मिळणार असल्याचे सांगितले व कंपनी ही ऑनबोर्डींग करण्याचे टीमला निर्देशित करण्यात आले.
सदर कंपनीच्या उपहमाला उत्तम कामगिरी असल्याचे मत व्यक्त केले. व पुढील वाटचाली करीता कंपनीला शुभेच्छा दिल्या. सदर भेटीच्या प्रसंगी कृषी विभाग आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विशाल पारीसे, कंपनीचे अध्यक्ष प्रमोद कटारे, उपाध्यक्ष संजय कावळे, व्यवस्थापकीय संचालक अजय कावळे, संचालिका सुशिला पटले, पप्पु पटले, मुकेश भोयर, विशाल बावनकर, मेघराज पटले, बचत गटातील सदस्य सौ. सविता अजय कावळे, ग्रामिण मित्रा ग्रामिण फाऊंडेशन, व कंपनीचे कर्मचारी मारोती नेत्राम, शुभम राहांगडाले, कंपनीचे पर्यवेक्षक व बायो प्रॉम ऑपरेटर प्रामुख्यान उपस्थित होते. कंपनीच्या माध्यमातून सुरू असलेल्या प्रत्येक उपकमाचा फायदा हा शेतकरी बांधवांनी घ्यावा असा संदेश देण्यात आला. व सगळ्यांचे आभार माणून कार्यक्रम संपल्याची घोषणा करण्यात आली.