भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त वडाळा (पैकु) चिमूर येथील स्मारकाला तसेच आझाद वार्ड परिसरातील बुद्ध विहाराला आ. बंटीभाऊ भांगडीया यांची भेट.
गणेश गभने
चिमूर तालुका प्रतिनिधी
8788618495
चिमूर-(दि:१४ एप्रिल ) आ. बंटीभाऊ भांगडीया यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त वडाळा (पैकु) चिमूर परिसरातील स्मारकाला भेट दिली व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून विनम्र अभिवादन केले आणि उपस्थित स्थानिक नागरिकांशी वार्तालाप केला.
यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य वसंतभाऊ वारजूकर, भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव मनिष तुम्पल्लीवार, भाजपा तालुका महामंत्री प्रशांत चिडे, भाजपा अनुसूचित जाती आघाडी तालुकाध्यक्ष जयंत गौरकार सर व इतर भाजपा पदाधिकारी तथा कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.
तसेच चिमूर येथील आझाद वार्ड परिसरातील बुद्ध विहाराला सुद्धा मा. आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी भेट दिली . तसेच भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून विनम्र अभिवादन केले.
या वेळी भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य वसंताभाऊ वारजुरकर, भाजयुमो प्रदेश सचिव मनिष तुम्पल्लीवार, भाजपा तालुका महामंत्री प्रशांत चिडे, भाजपा अनुसूचित जाती आघाडी तालुकाध्यक्ष जयंत गौरकार सर, भाजपा शहर महामंत्री श्रेयस लाखे, सागर भागवतकर व इतर भाजपा पदाधिकारी तथा कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.