बजाज चंद्रपूर तंत्रनिकेतन येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी 

अश्विन गोडबोले

चंद्रपूर महानगर प्रतिनिधी

मो: 8830857351

चंद्रपूर,13 एप्रिल:बजाज चंद्रपूर तंत्रनिकेतन येथे महान समाजसेवी, महिला शिक्षणाचे जनक क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची १९६ वि जयंती मंगळवार ११ एप्रिल रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, चंद्रपूर, समान संधी केंद्रा अंतर्गत साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे मुख्य कार्यपालन अधिकारी भरत बजाज यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करून व प्रतिमा पुजन करुन करण्यात आली.

बजाज चंद्रपूर तंत्रनिकेतन चे प्राचार्य सतीश ठोंबरे यांच्या मार्गदर्शनात आयोजित या कार्यक्रमात कॉलेजचे सर्व विभाग प्रमुख, शिक्षकवृंद आणि उपस्थित शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यानी प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले, कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रा. मालखेडे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here