बाबासाहेबांना वाचणे  काळाची गरज…

सौ. संगीता ठलाल 

मु. कुरखेडा जि. गडचिरोली 

मो:७८२१८१६४८५

     आज भीम जयंती त्या निमित्ताने भारत देशात राहणाऱ्या तसेच जगातील सर्व बंधू, भगिणींना भीम जयंतीच्या हार्दिक, हार्दिक शुभेच्छा. खरं बघितले तर..आजचा शुभ दिवस सर्व जनतेसाठी खूप मोठा आनंदाचा तसेच उत्सवाचा दिवस आहे.कारण, आजच्याच शुभ दिनी माता भिमाई व पिता रामजी च्या पोटी कोहीनुर हिऱ्या पेक्षा श्रेष्ठ व महान पुत्र जन्मांला आला समाजात राहणाऱ्या दिन, दलितांचा कैवारी बणून आपले संपूर्ण आयुष्य जनतेच्या हितासाठी, त्यांच्या विकासासाठी अफाट संघर्ष करून चंदनासारखा झिजून गेला ती महा विभूती म्हणजेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, दिन,दलितांचा वाली, जगाचा उद्धारक, महान बुद्धीवान, कायदेपंडित, तथा ज्ञानाचा अथांग सागर, विश्वरत्न,भारतरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर होत. या महामानवाच्या जयंती निमित्त मी त्यांना माझे दोन्ही हात जोडून कोटी, कोटी वंदन करते.

       बाबासाहेबांचे नाव जरी मुखात आले तरी अंतकरणाला शांती मिळते व अंगात एक प्रकारची उर्जा निर्माण होते एवढे महान नाव डॉ.बाबासाहेबांचे आहेत. डॉ.बाबासाहेबांच्या बालपणापासून तर..त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत जीवन प्रवासाविषयी आपण अभ्यास करुन बघितले तर. .सर्व काही आपल्याला कळेल…आजच्या घडीला बघितले तर. . सर्वाकडे परिस्थिती नुसार सर्व काही सोई, सुविधा, पैसा, अडका, नौकरी, धनदौलत, रहायला घर व अंगभर कपडे,खायला अन्न, प्यायला पाणी आहे. पण, एवढे काही असूनही आज आपण शुन्यात आहोत हे, वास्तव सत्य आहे. म्हणूनच आज आपल्याकडे सर्व काही गोष्टी असताना सुद्धा ते, कार्य आपण करु शकत नाही ते, असंख्य महान कार्य व कधी न मिटणारे महान कार्य डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी असंख्य संकटाचा सामना करुन, हिंमतीने, धैर्याने,जिद्दीने, अभ्यासाने , कष्टाने , व प्रामाणिक पणे पूर्ण करुन दाखवले आहेत. आजच्या घडीला विचार करायला गेले तर…ते, सर्व महान कार्य सोपे नाही त्या,भयंकर काळात असंख्य संकटाचा सामना करुन बाबासाहेबांनी करून दाखवले आहेत. त्यासाठी माणसाच्या अंगात गुणा सोबतच सहनशीलता, माणुसकी, प्रामाणिकपणा,स्नेह, जिव्हाळा, प्रत्येकांविषयी आदर, मानसन्मान, दया,शांती, कष्ट, हिंमत, चांगले विचार, संस्कार, मेहनत, दैनदिन अभ्यास देशप्रेम, निरवेषणीपणा, समाजात राहणाऱ्या रंजल्या गांजल्यांची कदर , पाहिजे हे, सर्व गुण त्याबरोबरच बरेच काही महान गुण डॉ.बाबासाहेब आंबेडकर मध्ये होते म्हणून त्यांनी स्वतः चा विचार न करता साऱ्या जनतेच्या भल्यासाठी, न्याय, हक्क, शिक्षण मिळवून देण्यासाठी एकही दिवस स्वतः साठी न जगता प्रत्येक दिवस काहीतरी नवीन कार्य करुन जगाला प्रेरणा, संदेश दिले आहेत. पण,आज मात्र आपण काय करतो ..? आपण कसे जगतो..? याचेच आपल्याला भान राहत नाही.

        एका वर्षानी भीम जयंती जवळ आली की, पंधरा दिवसापासून आपण भीमजंयती साजरी करण्यासाठी उत्साहाने तयारीला लागतो व सर्व मिळून भीमजंयती साजरी करतो आणि सर्वांनी मिळून, मिसळून आनंदाने साजरी करायला पाहिजे. तसेच जगातील कान्याकोपऱ्यात सुद्धा भीम जयंती साजरी होणे आवश्यक आहे एकही कोपरा सुटायला नको. पण, त्यात मात्र एक गोष्ट खास आहे जेव्हा, बाबासाहेबांच्या जयंती निमित्त गावभर, गल्लोगल्ली, शहरात, चौकाचौकात ₹ली निघते व आपण जय भीम असे पवित्र, महान नाव जेव्हा मुखात ठेवून नारे देत असतात हेही अभिमास्पद व सन्मान पूर्वक आहे. पण,हे, फक्त, त्या दिवसापुरते व क्षणापुरते मर्यादित ठेवायचे का. .? असं कधीही करु नये तर. .महामानवा कडून आदर्श घेऊन जीवनाचे सार्थक केले पाहिजे. निदान त्या शुभ दिनापासून प्रत्येक मनुष्य प्राण्यांनी आपल्यात असलेल्या वाईट दुर्गृनांचा त्याग करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, व नवीन काहीतरी करण्याचा संकल्प केला पाहिजे. बाबासाहेबांनी आपल्याला जी शिकवण दिलेली आहे त्या शिकवणीतून समाजाच्या विकासासाठी, गोर, गरीबांसाठी, बळीराजासाठी, इतरांसाठी जेवढे काही चांगले करता येईल ते, करण्याची इच्छा व आवड ठेवली पाहिजे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हटल्यानेच कळत नाही तर..आधी त्यांना वाचणे गरजेचे आहे. त्यांनी केलेले महान कार्य आठवणीत ठेवायचे आहे, त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून चालत रहाणे आपणा सर्वांचे परम कर्तव्य आहे, एवढेच नाही तर..त्यांच्या संपूर्ण जीवन प्रवासाविषयी जाणून घेणे हि प्रत्येक मनुष्य प्राण्यांची जबाबदारी आहे, डॉ.बाबासाहेबा सारखे तर..या जगात दुसरा कोणीही होऊ शकत नाही व समोर एवढी बुद्धीवान विभूती होणे शक्य नाही.

      सर्वजण या विषयी आपण चांगल्याप्रकारे जाणूनच आहात निदान बाबासाहेबांचा लेकरू बनून त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून आपण चालत राहिलो तर.. या सारखी आनंदाची दुसरी गोष्ट नाही. व त्या प्रकारे चालण्याचा प्रयत्न केले पाहिजे. माणसा,माणसातील भेदभाव मिटवायला पाहिजे, बंधू, भावांचे नाते जोडून एकमेकांना समजून घेऊन व मदत करण्यासाठी धावून जाणे हि खरी माणुसकी धर्म आहे, खूप गरजेचे आहे असे, वागणे जर…प्रत्येक लेकरात असतील तर. ..बाबासाहेबांना सुद्धा आपल्या लेकरांचा अभिमान वाटेल. .व्यर्थ गोष्टींचा त्याग करून आपल्या जीवनाचे महत्व जाणून जगले पाहिजे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सर्वच काही दिले आहेत ते,टिकवून ठेवता आले पाहिजे. त्यांचे नाव जसे आदराने आपण घेत असतो तसच इतरांना हि सन्मान द्यायला शिकले पाहिजे. पुन्हा एक गोष्ट ती म्हणजेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचल्यानेच कळत असतात नाचगाना केल्याने नाही म्हणून प्रत्येकांनी बाबासाहेबांना वाचण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण, आजच्या घडीला अत्यंत काळाची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here