सरदार पटेल महाविद्यालयातील स्टुडंट्स क्लबच्या विद्यार्थ्यांची लोकमान्य टिळक कन्या विद्यालयाला भेट 

74

सरदार पटेल महाविद्यालयातील स्टुडंट्स क्लबच्या विद्यार्थ्यांची लोकमान्य टिळक कन्या विद्यालयाला भेट 

अश्विन गोडबोले

चंद्रपूर महानगर प्रतिनिधी 

मो:8830857351

चंद्रपूर,13 एप्रिल: चंद्रपूर येथील सरदार पटेल महाविद्यालयातील सुक्ष्मजीवशास्त्र विभागातील मायक्रोबायलॉजी स्टुडंट्स क्लबचे सर्व सदस्यांनी येथील लोकमान्य टिळक कन्या विद्यालयाला बुधवार 5 एप्रिल रोजी भेट दिली. शालेय विद्यार्थ्यानी विशेषता मुलींनी आपल्या आरोग्याबद्दल तसेच स्वच्छतेबद्दल घ्यावयाची काळजी याबद्दल मायक्रोबायलॉजी स्टूडंस क्लबच्या विद्यार्थ्यानी मार्गदर्शन केले.

हा उपक्रम सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर तसेच सुक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. व्हि. एस. वाढई यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. या उपक्रमादरम्यान स्टूडंस क्लबच्या विद्यार्थ्यानी शाळेतील विद्यार्थ्याना वयानुसार मानवी शरीरात होणा-या बदलाबद्दल व त्या बदलामुळे शरीरावर होणा-या परिणामाबद्दल सखोल मार्गदर्शन केले.

दरम्यान विद्यार्थ्यानी आपल्या दैनंदीन जिवनात काय बदल केले पाहीजे याची देखील माहीती दिली, सकस आहार, व्यायाम याचे आपल्या जिवनात काय महत्व आहे हे देखील पटवुन दिले. उपक्रमानंतर विद्यार्थ्याना शैक्षणिक वस्तु देण्यात आल्या. या उपक्रमात शाळेतील विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरीता विद्यालयाच्या मुख्याध्यापिका बंडावार मॅडम, खोब्रागडे मॅडम, पेटकर सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर तसेच मायक्रोबायलॉजी विभाग प्रमुख व बायोटेक्नालॉजी विभागाचे समनवयक, डॉ. व्ही. एस- वाढई यांनी मार्गदर्शन केले.

मायक्रोबायलॉजी स्टुडंस क्लबचे अध्यक्ष प्रेरणा मेश्राम, उपाध्यक्ष नेहा महतो, यास्मीन खान, मानसी भारती, सचीव अनिषा शेंडे, मोहीनी चवले, प्रिसीला तत्तुरी, वेदांत मोहुर्ले, आर्या बल्लावार, धनश्री धोडरे, कौस्तुभ खंडैत सुक्षमजीवशास्त्र विभागातील प्राध्यापकांनी व इतर विद्यार्थ्यानी कार्यक्रमाच्या यशस्विततेसाठी परिश्रम घेतले. आभार सानीया शेख हीने केले. उपरोक्त उपक्रमाबद्दल सर्वोदय शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा सुधा पोटदुखे, कार्याध्यक्ष अरविंद सावकार पोरड्डीवार, उपाध्यक्ष सुदर्षन निमकर, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव तथा माजी कुलगुरू गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली डॉ. किर्तीवर्धन दिक्षीत व राकेश पटेल, सगुणा तलांडी व एस. रमजान यांनी अभिनंदन केले.