राहुल गांधींचा पूर्व विदर्भात मोदी सरकार विरोधात एलगार
मोदी ची ग्यारंटी हे फसवेगिरी 10 वर्षात अदानी आणि अंबानी मालामाल
प्रवीण शेंडे जिल्हा प्रतिनिधी गोंदिया
मो.9834486558
भंडारा – साकोली
भंडारा जिल्ह्यातील साकोली इथे कल दिनांक 13/4/2024 ला काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सभा महाविकास आघाडी चे उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या प्रचार्थ घेण्यात आली, त्यात प्रामुख्याने महाविकास आघाडी चा घटक दल असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंत पाटील, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले आणि हजारोच्या संख्येने काँग्रेस कार्यकर्त्यां समोर काँग्रेस चे नेते राहुल गांधी यांनी हुंकार भरली. मोदीची ग्यारंटी ही सामान्य जनतेची, शेतकऱ्याची, आणि व्यापाऱ्यांची फसवेगिरी ग्यारंटी असल्याचे त्यांनी सांगितले. मागील 10 वर्षात गरीब ha गरीबच होत चालला तर अदानी आणि अंबानी सारखे धनाड्य अजून श्रीमंत होत चालले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांची सरकार हे फक्त अदानी साठीच काम करत आहे, शेतकऱ्यांना भूल थपा देऊन त्यांच्यावर एक प्रकारे अत्याचारच करीत असल्याचे मत राहुल गांधी यांनी वेक्त केले. त्यांनी मतदात्यांना आणि कार्यकर्त्यांना आव्हान केले की देशात काँग्रेस ची सरकार आली तर शेतकऱ्याचे असलेले कर्ज माफ करण्याय येईल. GST कमी करण्यात येईल तर भारत सरकारच्या 30 लाख नौकऱ्या ताबडतोब भरण्यात येईल अशी त्यांनी हमी दिली.राहुल गांधी यांनी काँग्रेस च्या ग्यारंटी मध्ये महिलांसाठी दर वर्षी 1 लाख रुपये तर शिक्षित नवयुकांना सुद्धा मासिक भत्ता देण्याची ही कबुली दिली. शेतकऱ्यांना सुद्धा त्यांच्या मालाचा योग्य तो भाव देण्याचे आणि पाहिजे असलेली मदत ही केंद्र सरकार करील अशी हमी दिली. या सर्व गोष्टी करण्यासाठी केंद्रात काँग्रेस ची सरकार येण्यासाठी आपण सर्वांनी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रशांत यादोरावजी पडोळे यांना आपले भरगोस मत देऊन विजयी बनविण्याचे आव्हान केले.