निजामपूर विभागातील भाले येथे भाले गाव ते भाले पाझर तलाव रस्त्याचे डाबरकरणं उदघाट्न. मा. ना. भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते…

निजामपूर विभागातील भाले येथे भाले गाव ते भाले पाझर तलाव रस्त्याचे डाबरकरणं उदघाट्न. मा. ना. भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते…

✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞

माणगांव:- माणगांव तालुक्यातील भाले गाव ते भाले पाझर तलाव रस्त्याचे “नामदार भरत शेठ गोगावले रोजगार हमीयोजना फलोत्पादन, खारभूमी विकास मंत्री ” यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न आज दि १३रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

सहयोग मित्र मंडळ मंचेकर आली व वरची आली यांच्या वतीने भाले गाव ते भाले पाझर तलाव रस्त्याचे डाबरीकरणं उदघाटन मा. श्री. नामदार भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला यावेळी समस्त ग्रामस्थ यांनी सुरुवातीला ढोल ताशाच्या गजरात तसेच पटाक्याच्या आतिश बाजी मध्ये मा ना भरत शेठ गोगावले यांचा स्वागत केले. यावेळी ग्रामस्थांमध्ये नवचैतन्य निर्माण झालेले पाहायला मिळाले भाले गावचे शाखा प्रमुख युवा सैनिक जगदीश खानविलकर, ग्रामपंचायत सरपंच राजाराम खाबे, भागाराम मंचेकर, जयंत खाबे भव्य महाडीक, श्याम चव्हाण तसेच समस्त ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम पार पडला.