डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमीत्त लोककल्याण फाउंडेशन आष्टी तर्फे इयत्ता १ ते ५ वी पर्यंतच्या १३० गरजू विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमीत्त लोककल्याण फाउंडेशन आष्टी तर्फे इयत्ता १ ते ५ वी पर्यंतच्या १३० गरजू विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप

✍️ लुकेश कुकडकर ✍️
गाडचिरोली तालुका प्रतिनिधी
मो 8999904994

गडचिरोली : सावित्रीबाई फुले उच्च प्राथमिक शाळा, आष्टी व लोककल्याण फाउंडेशन, आष्टी यांच्या वतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती साजरी करण्यात आली . तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमीत्त लोककल्याण फाउंडेशन, आष्टी तर्फे इयत्ता १ ते ५ वी पर्यंतच्या १३० गरजू विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप करण्यात आले. यावेळी युवती राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष तनुश्रीताई आत्राम यांनी शिकण्याचा हक्क आणि न्याय मिळवण्याची ताकद व समानतेचा हक्क या बद्दल बाबासाहेबांच्या विचारांवर मार्गदर्शन देण्यात आले. या कार्यक्रमाला उपस्थित उद्धघाटक म्हणून लाभलेले युवती राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष तनुश्रीताई आत्राम, लोककल्याण फाउंडेशन आष्टी तर्फे राहुल डांगे, प्रमुख अतिथी अमित वाघमारे गणन मल्टि फॉउंडेशन युथ अध्यक्ष महा. , अध्यक्ष संतोष ताटकोंडावर भ्र्रष्टाचार निर्मूलन समिती जिल्हा अध्यक्ष , मारोती करमे उपसरपंच महागाव , सौ. बेबीताई बुरांडे सरपंच ग्राम. आष्टी , एस. डी. गलबले मॅडम मु अ. सा , सौ. प्रतिभा एन. खोब्रागडे , सौ. ज्योती प्रदीप वाकडे , एम. यू . खोब्रागडे , सौ. ममताताई डांगे , प्रास्ताविक खोब्रागडे , जगताप मॅडम PSI आष्टी , अमोल थेरकर , सिद्धांत भडके पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.