रमाई नगर येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वा जन्मदिन मोठ्या थाटामाटात साजरा
जयंती निमित्ताने रमाई नगर तर्फे केक कापाण्यात आला व सांस्कृतिक कार्यक्रमा चे आयोजन
✍️मनोज एल खोब्रागडे✍️
सह संपादक
मोबाईल नंबर:8208166961
चंद्रपूर : – सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे चंद्रपूर येथील बाबूपेठ वार्डाच्या जवळ चांदा फोर्ट रेल्वे स्टेशन जवळ महाकाली कॉलरी रोड वर रमाई नगर हे एक छोटीशी वस्ती असून सर्व जाती धर्मातील लोक या वस्ती मध्ये राहतात परंतु येथील सर्व जातीचे लोक असून ही सर्व धर्माच्या महापुरुषाच्या जयंत्या एकत्र येऊन मोठ्या उत्साहात मोठ्या आनंदाने साजऱ्या करत असतात आज दिनांक 14/04/2025 ला देखील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जन्मदिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने रमाई नगर येथे लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम व सायंकाळला जयंती निमित्ताने मिरवणुकीत जाणाऱ्या बंधू भागनींना शरबत चे वाटप करण्यात आले.
परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जन्मदिनाच्या निमित्ताने रमाई नगरातील नागरिक एकत्र येऊन सकाळी 8 वाजेपासून रमाई नगरातील झेंडा ,व रमाई नगर नाव असलेल्या बोर्ड ची साफसफाई करून फुल हारानी सजवून ११ वाजता बुद्ध वंदना घेण्यात आली नंतर केक कापून फटाक्याची आतिशबाजी करून आनंद साजरा करून नंतर लहान मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रमचा आस्वाद नागरिकांनी घेतला यावेळी रमाई नगरातील नागरिकांनी भगवान बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटो ला हार चढवून फुलांचा वर्षाव करून मिठाई चे वाटप करून मोठ्या उत्साहाने व शांततेत हा कार्यक्रम पार पडला यावेळी या कार्यक्रमासाठी भावी नगर सेवक शिरीष भाऊ गोगुलवार व त्यांचे मित्र परिवार आणि शिवराज झोडे चरणदास मडावी , युवा झोडे , मनोज खोब्रागडे , शंकर झाडे , खेमराज मेश्राम ,धनराज झोडे, अमित मडावी ,सौरभ मडावी ,अनिकेत खोब्रागडे, आरव खोब्रागडे, संजय चवरे , साजन चवरे , रितिक चवरे अनिल ढाक, अनिल खांडरे ,सुरेंद्र पेंदोर ,लखन शेंडे,वतन शेंडे, आकाश शेंडे ,गुरुदेव दुर्योधन, निरंजनलाडे,अंकुशआवळे ,अतुल,डेंनी ,करणं, कुणाल, खुशाल झाडे, अल्का झोडे,वर्षा झोडे,अशाबाई झोडे,शीतल झाडे,जयाबाई घरडे ,ललिता ढोके ,योगिता ढाक,ललिता मेश्राम, सोनी मेश्राम, देविकाबाई चवरे,आशाबाई खाडरे ,रेखाबाई शेंडे, आशाबाई शेडमाके ,साधना कन्नाके, पुष्पा मडावी , पूजा पेंदोर ,मिनाबाई कन्हाके ,अल्काबाई दुर्योधन कांताबाई भैसारे आणि तसेच समस्त रमाई नगररातील महिला व पुरुष आणि युवकांनी आपआपली उपस्थित लावून
रमाई नगरातील समस्त नागरिकांनी व महिलानी विशेष परिश्रम घेतले.