जिल्हाधिकारी कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
मनोज एल खोब्रागडे
✍🏻सह संपादक✍🏻
मो. 9860020016
अमरावती : – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात तहसिलदार निलेश खटके यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.