युवकांकडून डॉक्टरांच्या वाहनाची तोडफोड; रुग्णाला दाखल करुन न घेतल्याने संताप.

75

युवकांकडून डॉक्टरांच्या वाहनाची तोडफोड; रुग्णाला दाखल करुन न घेतल्याने संताप.

युवकांकडून तोडफोड डॉक्टरांच्या वाहनाची; रुग्णाला दाखल करुन न घेतल्याने संताप.
युवकांकडून तोडफोड डॉक्टरांच्या वाहनाची; रुग्णाला दाखल करुन न घेतल्याने संताप.

✒आशीष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी✒
वर्धा:- चार दिवसांपूर्वी रुग्णाला दाखल करुन न घेतल्याचा राग मनात धरुन चौघांनी खासगी डॉक्टरच्या वाहनाची तोडफोड केली. ही घटना शुक्रवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास बॅचलर रोडवरील श्री हॉस्पीटलसमोर घडली.

शहरातील मालगुजारीपुरा परिसरात राहणारा आसिफ नामक युवक चार दिवसांपूर्वी आपल्या नातेवाईकाला डॉ. सचिन तोटे यांच्या श्री हॉस्पीटलमध्ये उपचाराकरिता घेऊन गेला होता. रुग्ण मृतावस्थेत असल्याने डॉक्टरांनी दाखल करुन घेण्यास नकार दिला. हाच राग मनात धरुन आसिफ आपल्या तीन सहका-यांसोबत शुक्रवारी रात्री श्री हॉस्पीटलपासून काही अंतरावर दबा धरुन बसला होता. यादरम्यान डॉ. तोटे यांचे चारचाकी वाहन हॉस्पीटलसमोर उभे दिसताच चौघांनीही वाहनासह परिसरातील घरांवर दगडफेक केली. यात वाहनाच्या काचा फुटल्या असून सुदैवाने कुणीही जखमी झाले नाही. या प्रकरणाची माहिती मिळताच रामनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार धनाजी जळक आपल्या कर्मचा-यांसह घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत चारही युवक तेथून पसार झाले होते. डॉ. सचिन तोटे यांच्यावर गुरुवारी रात्री सुद्धा एका व्यक्तीने हल्ला केला. परंतु रुग्णालयातील सुरक्षा रक्षक आणि एका व्यक्तीने त्याला पिटाळून लावल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. घटनेनंतर डॉ. सचिन तोटे हे रामनगर पोलिसात तक्रार देण्याकरिता गेले. वृत्तलिहिस्तोवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु होती.