गडचिरोली दोन जहाल नक्षलवाधाना ठार करण्यात गडचिरोली पोलीस दलास मोठे यश.
गडचिरोली दोन जहाल नक्षलवाधाना ठार करण्यात गडचिरोली पोलीस दलास मोठे यश.

दोन जहाल नक्षलवाधाना ठार करण्यात गडचिरोली पोलीस दलास मोठे यश.
 
या दोन्ही नक्षलवाद्यांवर होते 14 लाखांचे बक्षीस.

गडचिरोली दोन जहाल नक्षलवाधाना ठार करण्यात गडचिरोली पोलीस दलास मोठे यश.
गडचिरोली दोन जहाल नक्षलवाधाना ठार करण्यात गडचिरोली पोलीस दलास मोठे यश.

✒मनोज खोब्रागडे✒
पूर्व विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
गडचिरोली :- धानोरा उपविभागातील सावरगाव पोमके अंतर्गत येणाऱ्या मोरचूल जंगल परिसरात आज सकाळी नक्षलवादी व सी-60 जवानांत झालेल्या चकमकीत मोरचूल निवासी टीपागड एरिया प्लाटून-15 चा कमांडर राजा उर्फ रामसाय नेहरू मडावी व धानोरा तालुक्यातील बोटेझरी निवासी, कसनसूर एलओएस सदस्य रनिता उर्फ पुनीता चिंपळूराम गावडे या दोन नक्षल्यांचा पोलीसांनी खात्मा केला असल्याची माहिती गडचिरोली जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयाद्वारे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.

पोलीसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर मोरचूल जंगल परिसरात सकाळी 6 ते 6.30 वाजताच्या सुमारास सी-60 पोलीसांद्वारे केलेल्या सर्चिंग अभियाना दरम्यान 40 ते 50 नक्षलवाद्यांनी पोलीसांची चाहूल लागताच गोळीबार केला. पोलीसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात दोन नक्षली मारल्या गेले व बाकी जंगलाचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले.

मृतक राजा मडावीवर अनेक गुन्हे दाखल असून त्याच्यावर 12 लाखांचे बक्षीस ठेवण्यात आले हाते. तर रनिता वरही विविध गुन्हे दाखल असून तिच्यावर 2 लाखांचे बक्षीस होते. शोध मोहिमेदरम्यान एक एसएलआर, एक 8 एम.एम. रायफल, कुकर बाॅम्ब व आयईडी ‘सहित दैनंदिन वापराचे साहित्य जप्त करण्यात आले. या चकमकीत आणखी काही नक्षलवादी जखमी झाले असल्याची शक्यता पोलीसांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here