आता वर्धेतही आढळले म्युकर मायकोसिसचे 21 रुग्ण.

55

आता वर्धेतही आढळले म्युकर मायकोसिसचे 21 रुग्ण.

आता वर्धेतही आढळले म्युकर मायकोसिसचे 21 रुग्ण.
आता वर्धेतही आढळले म्युकर मायकोसिसचे 21 रुग्ण.

✒आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
वर्धा 14:- अमरावती, चंद्रपूर नंतर आता वर्धेतही म्युकर मायकोसिस रुग्ण आढळले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 21 रुग्ण आढळले असून त्यावर उपचार सुरू आहे. याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सचिन तडस यांनी सांगितले. वर्धा जिल्ह्यात एवढया मोठ्या संख्येने रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. वैद्यकीय सूत्रानुसार हा बुरशीपासून होणारा दुर्मिळ पण अत्यंत घातक संसर्ग आहे. यातून डोळे गमावल्याचे प्रकरण समोर आले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर या आजाराची उद्रेक वाढण्याची शक्यता आहे. कोरोना होऊन गेलेल्या लोकांना हा आजार होण्याची शक्यता बळावली आहे. रोगप्रतिकारक शक्ती हे याचे मुख्य कारणही आहे.