मोहूर्ली येथे वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

मोहूर्ली येथे वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

मोहूर्ली येथे वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

🖋अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
८८३०८५७३५१

सदर घटना आज दिनांक १४ मे रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली.मृतकाचे नाव जाईबाई माधव जेंगठे (66 वर्ष) राहणार मोहर्ली असे आहे.
प्राप्त माहितीनुसार तेंदूपत्ता संकलन करण्याकरिता सकाळी 7 वाजताच्या सुमारास सितारामपेठ येथील जयश्रीया रिसोर्टच्या मागील बफर क्षेत्रामध्ये तेंदूपत्ता गोळा करण्यास गेलेल्या 10 महिलांपैकी एका महिलेला वाघाने हल्ला करून जागीच ठार केले. या परिसरात नेहमीच वाघाचा वावर असल्याचे म्हटले जात आहे. घटनेची माहिती वनविभागाला मिळताच मोहर्ली बफर क्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी आर. जी. मून आपल्या टीम सोबत दाखल झाले व मृतकाच्या परिवारास तातडीची मदत म्हणून 50 हजार रोख रक्कम देण्यात आली.घटनास्थळाचा पंचनामा करून ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here