माणगांव येते नागरिक सेवा ट्रस्टतर्फे आरोग्य तपासणी शिबीर

माणगांव येते नागरिक सेवा ट्रस्टतर्फे आरोग्य तपासणी शिबीर

माणगांव येते नागरिक सेवा ट्रस्टतर्फे आरोग्य तपासणी शिबीर

भालचंद खाडे माणगांव शहर प्रतिनिधी 📝९०४९३२३८३६📝

माणगांव : -श्री समर्थ ऑप्टिकल्स माणगांव,मयुरी नर्सिंग होम, नागरिक सेवा ट्रस्ट माणगांव कोरोना रिमेडीज हिंद लॅब रक्त तपासणी, मारुती फौंउडेशन माणगांव व शिवम कॉम्पुटर च्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त कर्त्यव्यदक्ष पोलीस कर्मचारी व त्याच्या कुटूंबियाकरिता मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन मंगळवार दि १० मे रोजी करण्यात आले होते. उपविभागीय पोलीस अधीक्षक प्रवीण पाटील याच्या हस्ते शिबिराचे उदघाटन करण्यात आले वरिष्ठ पोलीस निरक्षक राजेंद्र पाटील, डॉ श्रुती देशमुख,डॉ अजय मेहता, डॉ शतनू डोईफोडे, डॉ तुषार शेठ,डॉ समीर शेलार, डॉ जगदीश बेडेकर, डॉ अभिजित मेहता, डॉ सुवर्णा राठोड, पोलीस अधिकारी, माणगांव तालुक्यातील सर्व पोलीस पाटील, वनविभागीय अधिकारी व आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते, संस्थेचे अध्यक्ष डॉ दीपक देशमुख यांनी शिबिराचे प्रास्तविकपर मनोगत व्यक्त केले पोलीस अधीक्षक प्रवीण पाटील व पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी मनोगत व्यक्त करून आरोग्य शिबिराचे आयोजन केल्या बद्दल संस्थाचे आभार व्यक्त केले.त्याच प्रमाणे माणगांव नागरिक सेवा ट्रस्ट चे उपाध्यक्ष रत्नदीप आंबरे, खजिनदार गणेश गोरेगावकर, सूत्रसंचालन अजित शेडगे सर्व पदाधिकारी यांनी अनमोल अशी मेहनत घेतली.