माणगांवमधून दुचाकी चोरीला अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल
सचिन पवार माणगांव तालुका प्रतिनिधी
📝८०८००९२३०१📝
माणगांव बस स्थानकाशेजारी असणाऱ्या व्ही मार्टच्या पार्किंग मधून लावून ठेवलेली दुचाकी चोरल्या प्रकरणी अज्ञात चोरट्यावर माणगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा गुन्हा दि ८ मे २०२२ रोजी दुपारी १.३० ते रात्री ११.४५ वाजण्याच्या दरम्यान घडला याबाबतची फिर्याद कमलाकर बाबू अर्बन वय वर्ष ४९ रा सुरव तर्फे निजामपूर ता माणगांव यांनी माणगांव पोलीस ठाण्यात दिली.
सदर गुन्ह्याबाबत माणगांवपोलीस सुत्राकडून मिळालेल्या माहिती अशी की या गुन्ह्यांची फिर्याद देणारे कमलाकर अर्बन याच्या मालकीची एक पेॅशन प्रो हिरोहोंडा कंपनी ची मोटार सायकल क्र एम एच ०६ ऐ आर ३५५२ जुनी वापरती अदाजित किंमत ९००० हजार रुपये ही दुचाकी गाडी कोणत्या तरी अज्ञात चोरट्या ने चोरून नेली आहे.
या गुन्ह्यांची नोद माणगांव पोलीस ठाण्यात कॉ गु रजि नं ११९/२०२२ भा द वि संहिता कलम ३७९ प्रमाणे करण्यात आला आहे सदर घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील याच्या मार्गदर्शनखाली महिला पोलीस नाईक के डी जाधव या करित आहेत.