खरकाडा गावात पार पडला प्रेमियुलांचा विवाह….
चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी मनोज गोरे
मो.9923358970
कोरपना :- तालुक्यातील खरकाडा येथील बारा ज्योतिर्लिंग महादेव मंदिर देवस्थान कमिटीच्या पुढाकारातून रामपुरी गावातील एका प्रेमी जोडप्याचा विवाह सोहळा दिनांक १३ मे२०२४ सोमवारला सायंकाळी ५ वाजता मोजक्यिच नातेवाईक व मित्रमंडळींच्या उपस्थितीत संपन्न झाला.. सोमेश्वर केशव राऊत असे वर मुलाचे नाव असून पंकीडा संजय तुपट असे वधू मुलीचे नाव आहे. दोघेही ब्रह्मपुरी तालुक्यातील रामपुरी गावातील रहिवासी आहेत
खरकाडा येथील बारा ज्योतिर्लिंग महादेव मंदिर देवस्थानचे अध्यक्ष रवींद्र ढोरे सचिव योगेश्वर ढोरे उपाध्यक्ष राजेश्वर पारधी, सहसचिव तुकाराम ठाकरे तसेच महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या पुढाकारातून रामपुरी गावातील सोमेश्वर राऊत आणि पंकीडा तुपट या प्रेमी जोडप्यांचा विवाह दिनांक १३ मे रोजी सोमवारला येथील प्रसिद्ध बारा ज्योतिर्लिंग महादेव मंदिरात सायंकाळी पाच वाजता लावून देण्यात आला. या प्रसंगी उपसरपंच ताराचंद पारधी, मनोज मैंन्द , धनराज ठाकरे विनायक ठाकरे,मुखरू ठाकरे, विनायक ढोरे,विनोद दोनाडकर, राजू शिलार, सदाशिव ठाकरे, अंबर कावळे, भगवान वलथरे, ज्ञानेश्वर वाघमारे राजू शिलार, मंगला राऊत मीननाथ मैंन्द, पिंटू कवासे, मच्छिंद्र शिऊरकार,यांच्यासह देवस्थान कमिटीचे पदाधिकारी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष पदाधिकारी गावातील महिला मंडळी पुरुष मंडळी आप्तेष्ट मित्रमंडळी मोजक्यीच नातेवाईक मंडळी उपस्थित होती..