बजाज चंद्रपूर पॉलिटेक्निक येथे युथ टेक कॅम्प २०२४ संपन्न
🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351
चंद्रपूर : 14 मे
सर्वोदय महिला मंडळ द्वारा संचालित, बजाज चंद्रपूर पॉलिटेक्निक येथे विध्यार्थ्यांना त्यांच्यामधील कलागुणांची ओळख व्हावी आणि त्यांच्यातील प्रतिभा विकसित करता याव्या, तसेच विद्यार्थ्यामधला न्यूनगंड संपवून आत्मविश्वास निर्माण व्हावा या उद्देशाने १५ दिवसीय युथ टेक कॅम्प २०२४ चे आयोजन २६ एप्रिल २०२४ ते १४ मे २०२४ सकाळी १०. ०० ते १२.०० या वेळेत बजाज चंद्रपूर पॉलिटेक्निक येथे करण्यात आले होते. या शिबिरामध्ये विविध विषयातील पारंगत व्यक्तींचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले.
शिबिरामध्ये विद्यार्थ्यांकरिता सॉफ्ट स्किल, एमएस-सीआयटी, वेब डिझायनिंग, बेसिक इलेक्ट्रोनिक्स आणि इलेक्ट्रिकल, आर्ट, क्राफ्ट, स्पोर्ट आणि गेम आणि बऱ्याच विविध विषयावर प्रात्यक्षिक – प्रशिक्षण देण्यात आले. या शिबिराच्या आयोजनासाठी बजाज चंद्रपूर पॉलिटेक्निकच्या सर्व कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. संस्थेच्या अध्यक्षा नील सी. बजाज , संस्थेच्या सचिव ममता बजाज, संस्थेचे मुख्य कार्यपालन अधिकारी भरत बजाज, बजाज तंत्रनिकेतन चे प्राचार्य डी. के. चौधरी यांनी युथ टेक कॅम्प २०२४ या संधीचा लाभ घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.