टिम उबेरिमा फाईड्सतर्फे रिस्टार्ट कार्यक्रम संपन्न
• भारतीय जीवन विमा निगमचे विकास अधिकारी अभिषेक रॉय यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रम संपन्न
🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351
चंद्रपूर : 14 मे
कॅन्सर सारख्या अत्यंत भयावह व जिवघेण्या आजारावर मात करीत पून्हा नव्या जोमाने उत्साहाने आपल्या टिम उबेरिमा फाईड्सच्या माध्यमातून वर्ष २०२४ मध्ये तब्बल २००० पॉलीसीचे लक्ष गाठणाऱ्या अभिषेक रॉय सारख्या कर्तुत्ववान, लढवय्या योध्याच्या सन्मानार्थ रविवार,१२ मे रोजी स्थानिक एन.डी. हॉटेलमध्ये एल.आय.सी टिम उबेरीमा फाईड्सच्या वतीने पुरस्कार वितरन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कॅन्सरसारख्या जिवघेण्या भयंकर आजाराच्या
काळात सुध्दा एल.आय.सी चे कार्य अविरतपणे सुरू ठेवित आपल्या अभिकर्त्याना योग्य मार्गदर्शन देत व जटील शस्त्रक्रियेनंतर काही काळातच आपल्या कर्तव्यावर येत आपल्या कामाने संपूर्ण जिल्हयात आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटविणारे अभिषेक रॉय यांचे कौतूक एल.आय.सी मध्ये सर्व स्तरावरून होत आहे.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी चंद्रपूर जिल्हातील शाखा व्यवस्थापक प्रकाश बांगर, वरिष्ठ अधिकारी वाहि साहेब होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात बांगर यांनी सुध्दा अभिषेक रॉय व त्यांच्या अनुपस्थितीत त्यांचे कार्य अत्यंत जबाबदारीने सांभाळणारी त्यांची पत्नी सपना रॉय यांचे व त्यांच्या संपूर्ण चमुचे कौतूक केले.
या कार्यक्रमात शतकविर अशोक बोलीवार, मनिषा गोडे, दिक्षा रामटेके, रमेश बलराज, सुमित गावंडे, अमित गुजरकर, धनराज पोईनकर, हेमराज गेडे, रुकसार शेख या सर्व अभीकर्त्याना सन्मानचिन्ह देत त्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन नौशाद सिध्दीकी तर आभार सपना रॉय यांनी मानले. कार्यक्रमाचा केंद्रस्थानी अभिषेक रॉय यांचे होते होते.