भिवंडी राजीव गांधी उड्डाणपुलाच्या खाली सुरुवातीला पडले जीवघेणे खड्डे; मनपा प्रशासनाचे धृतराष्ट्राच्या भूमिकेत.

62

✒️अभिजीत सकपाळ, मुंबई प्रतिनिधी ✒️
भिवंडी,दि.14 जुन:- मुंबई शहर आणि उपनगरात सतत सुरु असलेल्या पावसाने महानगरपालिकेचे पीतळ उघडे पाडले आहे. भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील राजीव गांधी उड्डाणपुलाच्या दुरुस्तीसाठी कोट्यावधी रुपये खर्च करूनही भिवंडी वासीयाना खड्ड्यांपासून मुक्ती मिळालेली नाही. 2006 मध्ये सुरू झालेला हा उड्डाणपूल सुरुवातीपासून कमकुवत असून मागील तीन वर्षांपासून अवजड वाहनांसाठी हा उड्डाणपूल बंद केला आहे. मागील दोन महिन्यांपासून या उड्डाणपुलाच्या दुरुस्तीला सात कोटी रुपये खर्च केले. परंतु, अजूनही उड्डाणपूल पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आला नसताना या उड्डाणपुलाच्या प्रारंभी पडलेले खड्डे हे वाहनांसाठी जीवघेणे ठरत आहेत.

उड्डाणपुलाच्या सुरुवातीलाच पडलेले खड्डे हे बरोबर चारचाकी हलक्या वाहनांच्या चाकाखाली येत असल्याने त्यांना या ठिकाणाहून वाहन चालवणे मोठ्या जिकरीचे ठरत आहे. त्यातच मागील तीन ते चार दिवस पडलेल्या पावसात या रस्त्यावर पडलेले खड्डे जीवघेणे ठरत आहेत. अशा परिस्थितीत या उड्डाणपुलाकडे व येथुन प्रवास करणाऱ्या वाहनचालकांकडे भिवंडी पालिका प्रशासनाचे पूर्ण दुर्लक्ष करीत असून, येथे तात्पुरती डागडुजी करण्यासाठी ही प्रयत्न करीत नसल्याने वाहन चालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.