चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात येणारे तूकूम प्रभाग क्रमांक 1, महेश नगर, येथिल पाईपलाईन साठी खोदून ठववलेला खड्डा श्रमदानातून बुजवून काढला

✍मनोज खोब्रागडे✍
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
चंद्रपूर :- सविस्तर वृत्त असे आहे क संतोष तेलंग, श्री.वासेकर काका आणि शाम हेडाऊ यांच्या घरासमोर रस्त्यावर सिमेंट रोड फोडून नळाची पाईप लाईन पाहण्यासाठी चार महिन्यांपूर्वीच एक मोठा खड्डा खोदून ठेवला होता. काम त काही झालं नाही पण हा खड्डा मात्र तसाच राहीला. एक खड्डा, चार महीने, चार नगरसेवक, चार चार दा सगळ्यांना फोन पण, स्मशानभूमीत ओटा बांधण्यासाठी अख्खी महानगरपालिका स्मशानभूमीत अगदी तत्परतेनी पोहोचते तेही फोटोग्राफर सोबत, त्याची जाहिरातनी बातमी पण परफेक्टहोईलयाची काळजी घेते. पण गेल्या चार महिन्यांपासून असलेला हा खड्डा बुजविण्यासाठी मात्र चार नगरसेवक साधा एक माणूस पाठवू शकत नाही कारण खड्डा बुजविण्यात कमीशन काय मिळणार?
शेवटी आज आडे साहेब, संतोष तेलंग , पिंटू वासेकर , कोसूरकर सर ,बंडूभाऊ आणि शाम हेडाऊ यांनीच श्रमदान करून हा खड्डा बुजविला. कारण खड्डा अगदी रस्त्यावर होता. मोठा होता पावसाच पाणि त्यात भरलं , अपघाताची शक्यता खूप होती. प्रश्न असा आहे की निवडणूकीच्या वेळी महेश नगर हे दत्तक घेतोय म्हणणारे मोठे कंत्राटदार, नगरसेवक, पार्षद हे शेवटी दत्तक घेतलेलं आपलं सख्ख नसतं हेच काय ते बरेचदा दाखवून देतात.