मुंबईकरासाठी मोठ्या दिलासा! माघील 24 तासात धारावीत एक पण कोरोना रुग्णांची नोंद नाही.

✒️नीलम खरात, मुंबई प्रतिनिधी ✒️
मुंबई,दि.14 जुन:- मुंबईकरांसाठी एक मोठ्या दिलासाची बातमी समोर आली आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी असलेली झोपडपट्टी धारावी भागात माघील 24 तासांत कोरोनाचा वायरसचा एकही नवीन रुग्ण समोर आला नाही. कोरोना वायरस बाधित एकही रुग्ण न आढळणे ही मोठी दिलासादायक बाब आहे.
कोरोना वायरसचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावी परिसरात कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळून आलेला नाही. कोरोनाचा भारतात शिरकाव झाल्यापासून धारावीबाबत सर्वांना अधिक चिंता वाटत होती. त्यादृष्टिने पावलेही उचलण्यात आली. त्याचा सकारात्मक परिणाम म्हणून धारावीची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. माघील वर्षी पहिल्या लाटेत कोरोना वायरस वाढत्या बाधीत रुग्णांमुळे धारावीला कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून जाहीर करण्यात आले होते. धडकी भरेल. अशी कोरोना रुग्णसंख्या धारावीमध्ये पाहायला मिळाली होती. मात्र, ‘मिशन झिरो’, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ यासह पालिका कर्मचारी, आरोग्य यंत्रणा, स्वयंसेवी संस्था अशा कोरोना योद्ध्यांच्या योगदानामुळे आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे कोरोनाविरोधात दिलेला लढा यशस्वी ठरल्याचे सांगितले जात आहे.
4 महिन्या नंतर पहिल्यांदा एकाही नव्या रुग्णाची नोंद
तब्बल चार महिन्यानंतर पहिल्यांदा धारावीत कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. धारावीची कोरोना मुक्तीच्या दिशेने होणारी ही वाटचाल अनेक ठिकाणी धारावी मॉडेल नावाने कोरोना विळख्यापासून दूर राहण्यासाठी मार्गदर्शकही ठरली.