एटापल्ली बिड्री येथे सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन संपन्न

19

एटापल्ली बिड्री येथे सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन संपन्न

एटापल्ली बिड्री येथे सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन संपन्न
एटापल्ली बिड्री येथे सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन संपन्न

मारोती कांबळे
एटापल्ली तालुका प्रतिनिधी
मीडिया वार्ता न्युज

०६९ (गडचिरोली) :-एटापल्ली तालुक्यातील येमली ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेले मौजा बिड्री येथे आदिवासी विद्यार्थी संघटनेचे विदर्भ नेते तथा माजी आमदार दीपकदादा आत्राम व जिल्हा परिषद अध्यक्ष अजय भाऊ कंकडालवर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रज्वल नागुलवार सचिव आविस यांच्या नेतृत्वात श्री पाराळी गावडे ते श्री बाजु वेलादी यांचा घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.स्थानिक नागरिकांनी जि.प.अध्यक्ष कंकडालवर यांच्याकळे अनेक वेळा सिमेंट रस्त्यांचे मागणी केली असता १५दिवसाचा आत मंजूर करून देण्याचा आश्वासन दिले होते व १५ दिवसाचा आत कामाला मंजुरी मिळाली व भूमिपूजन सुध्दा करण्यात आला याप्रसंगी माजी आमदार आत्राम व जि.प.अध्यक्ष अजय भाऊ कंकडालवर यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
यावेळी आविस सचिव श्री प्रज्वल नागुलवार,पोलीस पाटील विजय मडावी,ग्रा.प.सदस्य प्रकाश वेलादी,वैभाव दोनारकर, संतोषवार, संतोष इसरकर,गाव भूमिया,आविस कार्यरते व गावकरी यावेळी उपस्थित होते.