वर्धा कंत्राटी आरोग्य कर्मचा-याचे राज्य मंत्री प्राजक्त तानपुरे याना निवेदन.
वर्धा कंत्राटी आरोग्य कर्मचा-याचे राज्य मंत्री प्राजक्त तानपुरे याना निवेदन.

वर्धा कंत्राटी आरोग्य कर्मचा-याचे राज्य मंत्री प्राजक्त तानपुरे याना निवेदन.

वर्धा कंत्राटी आरोग्य कर्मचा-याचे राज्य मंत्री प्राजक्त तानपुरे याना निवेदन.
वर्धा कंत्राटी आरोग्य कर्मचा-याचे राज्य मंत्री प्राजक्त तानपुरे याना निवेदन.

आशिष अंबादे✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
वर्धा,दि.14 जुलै:- वर्धा जिल्ह्यातील कोरोना काळात काम केलेल्या कंत्राटी आरोग्य कर्मचारी यांना न्याय मिळवा म्हणून आज प्राजक्त तानपुरे राज्यमंत्री आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन महाराष्ट्र यांना वरील विषयास अनुसरून श्रीकांत धोटे युवक अध्यक्ष, वर्धा जिल्हा इन्टक यांच्या नेतृत्वाखाली सौ. अर्चनाताई भोमले अध्यक्षा विदर्भ इंटक यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आले. या मधे खालील मागण्या नमुद करण्यात आल्या.

१) वर्धा जिल्हात कोरोना काळात काही नर्सेस तसेच बॉईज यांच्याकडून जिल्हा आरोग्य प्रशासना ने नेमणूक करून त्यांच्या कडुन कार्य करून घेतले आणि त्यांनी ते यशस्वीपणे पार पाडले आहे. या मधे कोणी ९ महिने, ६ महिने, ३ महिने असे काम केले आहे परन्तु आता त्यांच्या कामाचा हक्काचा मोबदला (पगार) देण्याची वेळ निघुन गेली तरी सुधा त्यांचे २-३ महिन्याचे पगार प्रलंबित आहे व देण्याची टाळाटाळ करत असल्याचे दिसुन येत आहे. वर्धा जिल्हातील वेग वेगळ्या दवाखान्यात कोरोना काळात त्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या व त्यांच्या घरातील लोकांच्या जिवाची पर्वा न करता अविरत सेवा दिली व आरोग्य प्रशासनाला मदत करून जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात आणला. तरिही आपण या सर्व गोष्टींचा विचार करून त्यांचे पगार लवकरात लवकर करून त्याना त्यांच्या हक्काचा पैसा द्यावा.

२) कोरोना काळात रुग्णालयात काम केलेल्या अश्या सर्वाना कामावर घेण्यात यावे Covid व Covid च्या व्यतिरीक्त दुसर्या प्रोजेक्ट वर काम करण्यासाठी रुजू करावे.

३) महाराष्ट्रातील बाकी जिल्ह्यात जसे कंत्राटी आरोग्य कर्मचारी चालू ठेवले आहेत तसेच वर्धा जिल्हातील कर्मच्यारी घेऊन रोजगार देण्यात यावे.

४) ज्या कामासाठी कंत्राटी आरोग्य कर्मचारी घेण्यात आले तेच काम त्यांच्या कडुन करून घेण्यात यावे.

५) नियुक्ती करताना H.R. डिपार्टमेंट किवा अकाउंट डिपार्टमेंट साठी जे Documents पाहिजे ते पहिलेच घेण्यात यावे जेने करून त्याना पगार (मानधान) हा वेळेवर मिळेल.

६) कोरोना काळात काम केलेल्या सर्व कर्मचार्यना कामाच्या अनुभवाचे पत्र लवकर प्राप्त करून देण्यात यावे जेने करून त्याना कुठे पण काम मिळायला त्रास जाणार नाही.

७) ज्यानी कोरोना काळात काम केले अश्या लोकाना भविष्यात ज्या सरकारी जागा निघेल तिथे प्रथम प्राधान्य देण्यात यावे. अश्या आशयाचे निवेदन दिले.

या वेळी प्रामुख्याने श्री. संतोष पवार युवक तालुका अध्यक्ष इन्टक व कंत्राटी आरोग्य कर्मचारी शिष्टमंडळातील आशिष लोखंडे, प्रतिभा भानसे, कुंदा पटिल, पूजा सेगोकार, दिक्षा जामुन्कर, शिल्पा भस्मे, अक्षय फुलमाळी, शुभांगी बोन्दाडे, वैशाली दाभाडे, संजु ढोक आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here