करपलेली " माळरान पुन्हा फुलणार...!* माझे स्नेही निलेश झाडे सकाळ न्यूज धाबा यांचा एक सुरेख लेख
करपलेली " माळरान पुन्हा फुलणार...!* माझे स्नेही निलेश झाडे सकाळ न्यूज धाबा यांचा एक सुरेख लेख

*” करपलेली ” माळरान पुन्हा फुलणार…!* माझे स्नेही निलेश झाडे सकाळ न्यूज धाबा यांचा एक सुरेख लेख

करपलेली " माळरान पुन्हा फुलणार...!* माझे स्नेही निलेश झाडे सकाळ न्यूज धाबा यांचा एक सुरेख लेख
करपलेली ” माळरान पुन्हा फुलणार…!* माझे स्नेही निलेश झाडे सकाळ न्यूज धाबा यांचा एक सुरेख लेख

राजू ( राजेंद्र ) झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

गोंडपिपरीचे राजकारण भल्याभल्याना कळणार नाही.अनेक राजकीय अभ्यासकांनी गोंडपिपरीचा राजकारणापुढे शरणागती पत्कारली.अश्यात ” शिव ” धनूष्य उचलेल्या गोंडपिपरीतील नेत्याने आता ” वसूली ” चालणार नाही अशी दमदाटी कार्यकर्त्यांना दिली.हा ” दम ” नेमका कुणासाठी होता ? याची खमंग चर्चा तालुक्यात सूरू झाली. दुसरीकडे ” करपलेली ” माळरान आता पुन्हा फुलणार काय ? असे प्रश्नही आता उपस्थित केले जात आहेत.

नुकतेच गोंडपिपरी तालुक्यातील राजकारणात महत्वाचा घडामोडी घडल्या.अंधारातही उजेड पेरणार्या ” सूरज ” ( सूरज हा शब्द हींदी भाषेतील आहे मराठीत त्याचा अर्थ सूर्य होतो ) ने धनूष्य बाण हातात घेतले. या धनुष्य बाणातून निघालेल्या बाणाने अनेकजण घायाळ होतील,ही अवास्तव भिती अनेकांना भेडसावीत आहे.

दुसरीकडे मागील सहा वर्षात ज्यांची माळरान पार ” करपली ” होती ते आता भारीच उत्साहात आले आहेत.उत्साहाचा भरात त्यांनी फर्मान सोडले.आता वसूलीवीरांना माफी नाही.एकीकडे ” सूर्या ” ची एन्ट्री अन काही तासातच ” करपलेल्या ” माळरानाचा मालकाची प्रतिक्रिया येणे,या दोन्ही गोष्टी एकमेकांशी सलग्न असल्याचा चर्चा तालुक्यात सूरू आहेत.एका नवख्या पाहूण्याचे घरात पाय पडताच कुटूंब प्रमुख हादरण्याचे कारण काय ? नेमबाजाला अप्रत्यक्षपणे हा मारलेला टोमणा तर नाहीना ? नवख्या नेमबाजाचा ऐंन्ट्रीने मालक ” गर्भगळीत ” का झाला ? अश्या नानाविध चर्चांना तालुक्यात ऊत आला आहे. सहा वर्षात ज्यांचे ” थोबाळ ” तालुकावाशीयांना दिसले नाही ते अचानक प्रगटले आहेत.आल्या आल्या त्यांनी पारदर्शक कारभाराची घोषणा केल्याने अनेकांचा भुवय्या उंचावल्या आहेत.पुढे पुढे गोंडपिपरीचा राजकारणात ” जोर का झटका,जोर से लगा ” अश्या अनेक घटना घडणार असल्याची शक्यता राजकीय अभ्यासकांनी वर्तवीले आहे.

निलेश झाडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here