लोकप्रतिनिधींच्याच गावात पाणीपुरवठा बंद

राजू ( राजेंद्र ) झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपीपरी -तालुक्यातील विट्ठलवाडा येथे जीवन प्राधिकरण चंद्रपूर योजनेतून सात गावांना पाणीपुरवठा केला जातो.
मागील चार ते पाच दिवसा पासून पाणी पुरवठा बंद आहे.
जनतेच्या सेवेसाठी लोक प्रतिनिधी नेहमी तत्पर असणे आवश्यक आहे.पण तसे काही दिसून येत नाही.केवळ पद मिळविण्यापुरत राजकारणात उतरले का?असा सवाल नागरिक करीत आहेत. डडड पक्षकडून कशीबशी उमेदवारी मिळाली. जनतेचा कौल मिळाला .आता क्षेत्रांसह गावाच्या विविध समस्या सोडविल्या जातील.
असे ऐक ना अनेक सकारात्मक विचार जनता करू लागली.
क्षेत्राचा विकास सोडा आपल्या
गावातिल समस्या सोडविण्यासाठी धडपलं केली जात नाही
केवळ हे दुर्दैव!!
शासनाच्या योजना गोर गरिबां पर्यन्त पोहचविण्याचे कार्य जण प्रतिनिधी चे असते. शासनाच्या विविध योजनेचा लाभ गोरगरिबांना मिळवून देण्या करीत हे लोक प्रतिनिधी पैश्याची मागणी करतात.
अश्या लोक प्रतिनिधीं पदाचा
गैरफायदा घेत शाशकीय लाभ मिळवून देणासाठी केवळ ती धडपड करतात..आणि
लाभार्थ्यांकडून 500 ते 1200 रुपयाचीमागणी करीत लाभ मिळवून देत असल्याची गावपरिसरात चर्चा रंगू लागली आहे.
इकडे मात्र पिण्याच्या पाण्यासाठी जनतेची सुरू असलेली धावपळ दिसत नाही.
गाव विविध समस्येने ग्रस्त आहेत. नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो आहे अस्यास्तिथीत गावच्या समस्या सोडविण्यावर भर देण्याऐवजी फक्त मोठ्या पदावर विराजमान झालो ह्याचाच कांगावा करीत जिकडे तिकडे मिरवीत असल्याने निदर्शनास येत आहे.