महाविद्यालयात प्रवेशाच्या नावाखाली प्राध्यापकाने केली लाखोची फसवणूक,
पोलिसांनी प्राध्यापकाला ठोकल्या बेळ्या.

पोलिसांनी प्राध्यापकाला ठोकल्या बेळ्या.
✒नीलम खरात✒
मुंबई महानगर प्रतिनिधी
9136879930
मुंबई,दि.14 जुलै:- दक्षिण मुंबई येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दक्षिण मुंबई मधील एका प्रसिद्ध महाविद्यालयात मॅनेजमेंट कोटय़ातून प्रवेश मिळवून देतो असे सांगुन प्राध्यापकाने एका विध्यार्थीनीची फसवणूक केल्याचे समोर आल्याने सर्वीकडे संताप व्यक्त करण्यात येत आहे. प्रवित्र शिक्षकी पेशेला काळीमा फासणा-या प्राध्यापकाला उत्तर प्रादेशिक विभाग सायबर पोलिसांनी अटक केली. सुशील मिश्रा असे त्याचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार हे ज्येष्ठ नागरिक असून ते बोरिवली परिसरात वास्तव्य करतात. तक्रारकर्ते यांच्या मुलीला मास्टर ऑफ मॅनेजमेंट या अभ्यासक्रमात प्रवेश घ्यायचा होता. तेव्हा एकाने सुशील मिश्रा हा मॅनेजेमेंट कोटय़ातून प्रवेश मीळवुन देतो असे तक्रारदारांना सांगितले. त्यानंतर गेल्या वर्षी तक्रारदार हे सुशीलला कांदिवलीच्या ठाकूर कॉम्प्लेक्स परिसरात भेटले. भेटीदरम्यान तक्रारदारांनी दोन्ही मुलींना मॅनेजमेंट कोटय़ातून प्रवेश हवा असल्याचे सुशील मिश्रा सांगितले. मॅनेजमेंट कोटय़ातून प्रवेश हवा असल्यास 9 लाख रुपये खर्च होईल असे सुशीलने तक्रारदारांना सांगितले. त्यावर विश्वास ठेवून तक्रारदारांनी त्यांच्या मुलींची कागदपत्रे सुशीलला दिली. सुशीलने बनावट आयडी बनवून मुलींचा मॅनेजमेंट कोटय़ातून प्रवेश झाल्याचे तक्रारदारांना सांगितले. मुलींना प्रवेश मिळाल्याने तक्रारदारांनी पैसे सुशीलला दिले. विश्वास बसावा म्हणून महाविद्यालयाच्या फीसची पावती तक्रारदारांना इ -मेलवर पाठवली.
फेब्रुवारी महिन्यात सुशीलने कॉलेजच्या इ-मेल आयडीवरून तक्रारदारांच्या मुलीचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड पाठवून दिला. एवढंच नव्हे, तर सध्या कोविडमुळे ऑनलाइन लेक्चर सुरू असतात, त्या ऑनलाइन लेक्चरचा आयडी आणि पासवर्डदेखील तक्रारदारांना पाठवला. काही दिवस ऑनलाइन लेक्चर झाल्यावर एप्रिल महिन्यात अचानक लेक्चर घेणे बंद झाले. हा प्रकार तक्रारदारांना संशयास्पद वाटल्याने त्यांनी सुशीलला विचारणा केली. तेव्हा सुशीलने तुमच्या मुलींचे अॅडमिशन झाले नसून तुमचे पैसे पाठवून देतो असे तक्रारदारांना सांगितले, पण सुशीलने पैसे न दिल्याने तक्रारदारांनी उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलिसांनी तपास करून सुशीलला अटक केली. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावली आहे.