ठाणे महानगर पालिकेचे उपायुक्त विश्वनाथ केळकर यांच्याविरोधात महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल.
✒अभिजीत सकपाळ✒
भिवंडी ठाणे प्रतिनिधी 9960096076
ठाणे,दि.14 जुलै:- मुंबईच्या उपनगर ठाणे मधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. कोविड केअर सेंटर रुग्णालयातील 38 वर्षीय माजी महिला कर्मचारी पोलिसात स्टेशन मध्ये जाऊन दिलेल्या तक्रारीच्या आधारे ठाणे महापालिकेचे उपायुक्त विश्वनाथ केळकर यांच्याविरोधात बुधवारी कापूरबावडी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे सांगत केळकर यांनी मात्र आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत.
ठाणे महापालिकेच्या बाळकूम येथील ग्लोबल कोरोना रु ग्णालयात पिडीत महिलेची कंत्राटी पद्धतीने परिचारक म्हणून भरती झाली होती. त्यावेळी उपायुक्त केळकर यांच्याकडे या रु ग्णालयाचा कारभार होता. काही महिन्यांपूर्वी रु ग्णालयात काम करतांना केळकर यांनी विनयभंग केल्याचा आरोप महापालिका प्रशासनाकडे तसेच विशाखा समितीकडे केला होता. त्यानंतर कागदपत्रे अपूर्ण असल्याचे कारण देत महापालिका प्रशासनाने या महिलेला कामावरून काढले. याची माहिती भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांना मिळाल्यानंतर त्यांनी बुधवारी ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांची भेट घेतली. तसेच केळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर त्यांच्या विरोधातील कारवाईला वेग आला. बुधवारी सायंकाळी पिडीत तरुणीने कापूरबावडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल झाला आहे.