तालुक्यातील धान, सोयाबीन कापुस पिके पाण्याखाली

बाबा मेश्राम

सावली तालुका प्रतिनिधी

मो:7263907273

सावली : तालुक्यात गेली सहा दिवसापासुन संततधार सुरु असलेल्या पावसाचनेक्षथैमान घातले असुन गोसीखुर्द धरनाचे पाणी सोडले असतांना वैनगंगा नदी धोक्याच्या बाहेर जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे नदीजवळील गावात नदीचे पाणी शिरण्याची शक्यता आहे असे या परिसरातील नागरिकांनी सांगितले आहे.

मागील चार दिवसापासून संततधार पाऊस सुरु असल्याने जनजीवन प्रभावित झाले आहे. तसेच सतत च्या पावसाने मोठ्या प्रमाणात घरांची व शेतातील पिकांचे नुकसान होत आहे. आज पावसाने उसंत घेतल्यानंतर परत पावसाची सरी येत आहे. त्यामुळे नदी, नाले ओसंडून वाहत आहे.

सावली तालुक्यातील जिबगाव, सिर्सी, लोढोंली हरांबा ही गावे नदीला लागून असल्यामुळे जर पावसाने उसंत घेतली नाही तर नदीचे पाणी गावात शिरायला वेळ लागणार नाही असे या परिसरातील शेतकऱ्यांसह नागरिकांनी सांगितले आहे. कापूस सोयाबीन धान पिके पाण्याखाली गेली असून ते खरडून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, परिणामी प्रशासनाने पंचनामे करून आर्थिक मदत करावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य राकेश गोलेपल्लीवार यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here