शिंदे सरकारचा मोठा निर्णय पेट्रोल-डिझेलच्या भावात मोठी कपात

52

शिंदे सरकारचा मोठा निर्णय पेट्रोल-डिझेलच्या भावात मोठी कपात

अश्विन गोडबोले

चंद्रपूर महानगर प्रतिनिधी

मो:8830857351

मुंबई: महाराष्ट्रात पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 5 रुपयांनी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय डिझेलच्या दरातही 3 रुपयांनी कपात होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी मुंबईत त्यांच्या सरकारच्या या निर्णयाची घोषणा केली. ज्याचा फायदा सर्वसामान्यांना होईल. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात हा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्राच्या नव्या सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. 1975 मध्ये आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेल्या लोकांना राज्यात पेन्शन देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. महाराष्ट्रात असे 3600 लोक आहेत.पेट्रोल आणि डिझेलबाबत बोलताना एकनाथ शिंदे सरकारने यापूर्वीच दर कमी करण्याचे संकेत दिले होते. याला आता मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

केंद्र सरकारने दीड महिन्यांपूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात केली होती. केंद्राने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क अनुक्रमे 8 आणि 6 रुपयांनी कमी केले होते. यानंतर महाराष्ट्र सरकारनेही राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला होता. महाराष्ट्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट अनुक्रमे 2.08 रुपये आणि 1.44 रुपये प्रति लिटरने कमी केला आहे. आता पुन्हा लोकांना दिलासा मिळाला आहे.