चंद्रपूरच्या तरुणीला मिळाला “महाराष्ट्रातील अग्रगण्य महिला व्यवसायीक उद्योजक सन्मान, नाशिक येथे भव्य सोहळ्यात महाराष्ट्र बिझनेस आयकॉन अवॉर्डस २०२३ चे वितरण

अश्विन गोडबोले

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

मो: 8830857351

चंद्रपूर : आजच्या काळात उद्योग उभा करणे म्हणजे रिस्क आहे. उद्योगात नेहमी रिस्क असतेच. उद्योग हा चेस बोर्ड असून, मात्र उद्योजक स्वतः बरोबरच देशाचही भविष्य घडवू शकतात. भारत हा एक असा देश आहे की जो उद्योजकता आणि संशोधन यात सर्व देशांना मागे टाकू शकतो. 

रिसिल डॉट इन तर्फे नुकतेच महाराष्ट्र बिझनेस आयकॉन अवॉर्डस २०२३ चे वितरण केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी डॉ. पवार बोलत होत्या. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेत्री तेजस्विनी पंडित, मुन मून दत्ता आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे ना. डॉ. पवार म्हणाल्या की आधी देशात एस एच होते. जे आता स्टार्टअप इंडिया नंतर नव्वद हजारपेक्षा जास्त ग्रुप तयार झाले आहेत. या सर्व उद्योजकांचा एक ग्रुप तयार करून त्यांना येणाऱ्या अडचणींना आले. कमी करण्यासाठी आणि त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी रिसील डॉट इन ने एक चांगल व्यासपीठ उभ केल आहे. यातून उद्योजकांच्या अडचणी सुटतील. अशा अनेकविध महत्त्वाच्या मुद्द्यावर त्यांनी प्रकाश टाकत उद्योजकांना संबोधित केले. सर्व उद्योजकांना शुभेच्या दिल्या. अनेक उद्योजक विविध शासकीय व खाजगी संस्थांच्या एकत्रिक प्रोत्साहन धोरणातून एका व्यासपीठावर आणल्याबद्दल रिसील. इन आणि सुधीर पठाडे यांचे आभार व्यक्त केले.

यावेळी महाराष्ट्रसह इतर राज्यातून आलेल्या अनेक उद्योजकांना सन्मानित करण्यात आले. यात रियल इस्टेट, कृषी, आय.टी, सोलार, शिक्षण, बँकिंग, शेअर मार्केट , मॅनुफॅक्चरिंग, आरोग्य आणि वेलनेस, सोसिअल, फॅशन, कला, हॉटेल अश्या अनेक क्षेत्रातील दिग्गजाना त्यांचा कर्तृत्वाचा मान मिळाला. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित तसेच हिंदी अभिनेत्री मून मून दत्ता यांच्या हस्ते नाशिक येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये उद्योजकांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

यात चंद्रपूर जिल्ह्यातील युवा व्यवसायिका गोमती मनोहर पाचभाई यांना महाराष्ट्रातील “अग्रगण्य महिला व्यवसायीक उद्योजक 2023″या पुरस्काराने गौरवान्वित करण्यात आले.

गोमती मनोहर पाचभाई चंद्रपूर व्यवसाय ते पत्रकारिता या क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. बीएस्सी, एमबीए , पीजीडीबीए अशी उच्चशिक्षित असलेली ही युवती अनेक आव्हानांना सामोरी जात आज समाजात प्रतिष्ठित प्लॅटफॉर्मवर कार्यरत आहे.

फायनान्स व बँकिंग क्षेत्रात डेहराडून युनिव्हर्सिटी येथून एमबीए उत्तीर्ण केलेल्या गोमती यांनी स्वतः चा इनफिनिटी-17 कंपनीज ग्रुप उभा केला व या विविध व्यवसायीक क्षेत्रात कार्य करणाऱ्या ग्रुप च्या त्या सा मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. ताई फाउंडेशन या समाजसेवी संस्थेच्या त्या अध्यक्ष आहे. खबरकट्टा या चंद्रपूर जिल्ह्यातील अतिशय लोकप्रिय अश्या न्यूज वेबसाईट च्या त्या मुख्य संपादक आहे. सोबतच SEBI एसईबीआय रजिस्टर्ड शेअर बाजार NSE एनएसई, बीएसई,MCX एमसीएक्स च्या सब ब्रोकर म्हणून त्या कार्यरत आहे.त्यांचे या क्षेत्रातील कार्य तरुणाई साठी मार्गदर्शक व प्रेरणादायी आहे.

व्यावसायिक शिक्षण घेत असतानाच NISM -National Institute of Securities Market या देशातील शेअर मार्केट संबंधित विविध परीक्षा त्यांनी दिल्या. त्याच cash, derivatives, mcx Certification च्या माध्यमातून 2010 मध्ये देशात नामांकित शेअर मार्केट exchanges BSE व NSE मध्ये AUTHORISED Person म्हणून काम करण्याची संधी मिळाल्यावर IIFL या अग्रगण्य ब्रोकर सोबत मिळून SEBI – Securities Exchange Borad Of India चे लीगल रेजिस्ट्रेशन मिळण्यानंतर शेअर बाजारात स्वतंत्र ब्रोकर म्हणून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. महारष्ट्रात टॉप_रँकिंग_ब्रोकर (ब्रोकरेज गेनर -महिन्याला 25लक्ष पेक्षा अधीक ) म्हणून सतत त्यांचे नाव अग्रेसर राहिले . ऍक्सिस बँके सारख्या बँकिंग क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेत दोन वर्षे उच्च पदावर काम करून सामाजिक क्षेत्रात काहीतरी करण्याची उर्मी उराशी बाळगून गोमती ब्रोकर क्षेत्रातील कामाशी बांधीलकी कायम राखत पत्रकारितेच्या क्षेत्रात आली.

शोधक वृत्त ,अन्याय सहन न करण्याची वृत्ती,लेखन कौशल्य आदी गुणवैशिष्ट्याच्या बळावर गोमतीने या क्षेत्रात खबरकट्टा डॉट कॉम च्या माध्यमातून स्वतःला सिद्ध केले. खबरकट्टा चे दर दिवशी वाढणारे वाचक व लोकप्रियता हे गोमतीच्या कौशल्याचे व परिश्रमाचे फलित आहे.

राजकारण , समाजकारण , पत्रकारिता व प्रशासकीय सेवेतील अनेक व्यक्तींचा, त्यांच्या कार्याचा सखोल अभ्यास करण्याची संधी गोमतीला मिळाली. लोकसभा , विधानसभेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांनी पुरविलेली अभ्यासपूर्ण माहिती, आकडेवारी राजकीय सर्वे करणाऱ्या देशातील अग्रगण्य राजकीय विश्लेषक कंपनीला विदर्भातील राजकीय समीकरण सुसूत्रात बांधण्यासाठी सहाय्यभूत ठरले.त्या त्या संस्थांकडून गोमती कौतुकास पात्र ठरल्या .आज वेस्टर्न कोलफिलड्स लि. सारख्या कोळसा खाणीतसुद्धा ट्रेडर म्हणून यशस्वीपणे सुरू असलेला त्यांचा व्यवसाय यशस्वी उद्योजिका म्हणून त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष देणारा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here