कल्याण शीळ रोडवर मानपाडा येथे वृद्ध इसमाचा गाडीखाली चिरडून मृत्यू….

हिरामण गोरेगावकर 

डोंबिवली,14 जुलै:

देशात सगळीकडेच रस्ते अपघातच प्रमाण दिवसेदिवस वाढत असल्याने रोजच कित्तेक लोक अपघाताचे बळी ठरत आहेत असाच प्रकार कल्याण डोंबिवली महानगपालिकेच्या हद्दीत कल्याण शीळ रोडवर मानपाडा येथे आज दि 14 रोजी सकाळी सुमारे 7:40 च्या दरम्यान एका अज्ञात वृद्ध इसमाचा गाडीखाली चिरडून मृत्यू झाला, पण हा अपघात कोणत्या वाहनाने झाला हे मात्र कळू शकले नाही कारण प्रथम दर्शनी असा कोणताच पुरावा नव्हता .बराच वेळ झाला तरी या अपघाती इसमाजवळ कोणी फिरकू शकला नाही.

काही वेळाने मीडिया वार्ता न्युज चे पत्रकार हिरामण गोरेगावकर या ठिकाणी पोहोचले त्यांनी तात्काळ मानपाडा पोलीस स्टेशन मध्ये संपर्क साधून पोलिसांना सदर घटनेची माहिती दिली.पोलिसानी सुद्धा या घटनेची गंभीर दखल घेत तात्काळ बिट मार्शल यांना घटना स्थळी पाठवले त्यानंतर सदर घटनेची पाहणी करून रुग्णवाहिका उपलब्ध करून अपघाती व्यक्तीस मृतदेह घेऊन रुग्णालयात घेऊन गेले .

मृत व्यक्तीचे जवळ कोणताही ओळख पत्र नसल्याने ओळख पटवता न आल्याने पोलिसांनी अज्ञात अशीच अपघाताची नोंद केली . सदर अपघात पराडाईज डेवलपर यांच्या गेट समोर झाल्याने तेथील असणारे सी सी टीव्ही फुटेज तपासून पुढील तपास करणार असल्याचे स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here