माणगांव तालुक्यातील भादाव गावची सुकन्या निलिशा भादावकर बनली पहिली वकील…

सचिन पवार

कोकण ब्युरो चीफ

मो: 8080092301

माणगांव :-निलिशा भादावकर हिचे वडील हे माणगांवचे माजी ग्रामपंचायत सदस्य असून ते द. ग. तटकरे महाविद्यालय येथे कर्मचारी म्हणून काम पाहत आहेत ते सर्वसामान्य कुटूंबातील व्यक्तिमत्व असून त्यानी कंटोर मेहनत घेऊन नीलिशाला शिक्षण दिले नीलिशाला क्रिडा क्षेत्रातील कब्बड्डी खेळाची विशेष आवड आहे. तिचे प्राथमिक शिक्षण पहिली ते चौथी पर्यत शिक्षण भादावं गावी झाले तर पाचवी ते बारावी अशोकदादा साबळे विदयालय येथे झाले तसेच पुढील शिक्षण तिने माणगांव येथील द. ग. तटकरे महाविद्यालय येथे घेतले असून पुढील वकील पदवीसाठी अशोक दादा साबळे विधी महाविद्यालय येथे शिक्षण घेऊन तिने आज भादाव गावची पहिली वकिली होण्याचा मान पटकविला आहे .

माणगांव शिक्षण प्रसारकं मंडळाचे अध्यक्ष अँड. राजीवजी साबळे माणगांव नगरपंचायत चे नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार,माजी नगराध्यक्ष आनंदशेठ यादव, उपनगराध्यक्ष राजेश मेहता स्वछता सभापती दिनेश रातवडकर यांनी विशेष अभिनंदन केले माणगांव तालुक्यातील भादाव गावची पहिली वकील होण्याचा मान निलिशा दिलीप भादावकर हिने पटकवीला असून तिचे तालुक्यात सर्वस्तरातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे. आज ती भादाव गावासह संपूर्ण माणगांव तालुक्यात अँड. निलिशा दिलीप भादावकर म्हणून ओळखली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here