आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नाला यश : जिल्ह्यातील केशरी शिधापत्रिका धारकांना लवकरच उपलब्ध होणार धान्य.

✍संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800
राजुरा :– राजुरा विधानसभा क्षेत्रातील राजुरा, कोरपना, जिवती, गोंडपिपरी या चार तालुक्यामध्ये तसेच चंद्रपूर जिल्ह्य़ातील शेकडो विधवा, भुमिहिन, अपंग, शेतमजूर नागरीक शासनाचे अन्नधान्य मिळण्या पासून अजुनही वंचित आहेत. चंद्रपूर जिल्ह्य़ातील या सर्व केशरी शिधापत्रिका धारकांना प्राधान्य कुटुंब योजना, अंत्योदय योजनेनुसार लाभ देण्यात यावा अशी मागणी आमदार सुभाष धोटे यांनी राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षक मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली होती. त्यांच्या मागणीला यश आले असून मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्देशानुसार संबंधित विभागाने तातडीने कारवाई केली असून चंद्रपूर जिल्ह्य़ातील केशरी शिधापत्रिका धारकांना लवकरच अन्नधान्य उपलब्ध होणार आहे.
आमदार सुभाष धोटे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की या सर्व कुटुंबियांकडे स्वतःचा उदरनिर्वाह करण्याकरीता पर्यायी कोणतेही साधन नसल्याने प्रर्वगातील अनेक कुटुंबियांची उपासमारी होत आहे. त्यामुळे विधवा, अपंग, भूमिहीन नागरीक यांना अंत्योदय योजनेचा लाभ देनेबाबत नागरिकांकडून वारंवार मागणी केली जात आहे. तसेच १ जुलै २०१९ नंतर च्या केशरी कार्ड धारकांना प्राधान्य कुटुंब योजनेत समाविष्ट करून धान्य उपलब्ध करून देण्या बाबत संबंधीत यंत्रणेला सुचना देण्यात याव्यात. मंत्री भुजबळ यांनी त्यांच्या या मागणीची दखल घेऊन संबंधित विभागाला चंद्रपूर जिल्ह्य़ातील केशरी शिधापत्रिका धारकांना लवकरात लवकर अन्नधान्य पुरवठा करण्यासंदर्भात निर्देश दिले आहेत. संबंधित विभाग कामाला लागले असून लवकरच सर्व केशरी शिधापत्रिका धारकांना अन्नधान्य उपलब्ध होणार आहेत.