हिंगणघाट संत गोमाजी वार्ड येथे जुन्या वादातून चौघांनी मिळून केला एकाचा खून

हिंगणघाट संत गोमाजी वार्ड येथे जुन्या वादातून चौघांनी मिळून केला एकाचा खून

हिंगणघाट संत गोमाजी वार्ड येथे जुन्या वादातून चौघांनी मिळून केला एकाचा खून
हिंगणघाट संत गोमाजी वार्ड येथे जुन्या वादातून चौघांनी मिळून केला एकाचा खून

आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
 हिंगणघाट , दि.14 ऑगस्ट:- घटनेची हकीकत संत गोमाजी वार्ड येथे इरफान खान रशीद खान पठाण यांचा आरोपी हर्षल गिमेकर ,नितीन तडस ,जावेद शेख उर्फ कालू, योगेश नरड उर्फ जादू यांच्यासह जुना वाद विवाद होता तसेच दि, 13 – 8 – 2021 सायंकाळी 5 वाजता सुमारास इरफान खान रशीद खान (मृतक) याचा हर्षल गिमेकर उर्फ भुर्‍या यांच्यासोबत वाद होऊन त्याला दोन-तीन थापड मारल्या आरोपी हा राग मनात धरून असल्याने इरफान खान रशीद खान पठाण ( मृतक ) व फिर्यादी हे रात्री 11.30 ते 12 सुमारास राणा हॉटेल येथून जेवण करून घरी परत जात असताना यातील आरोपी हर्षल गिमेकर उर्फ भुऱ्या याने संत गोमाजी वार्ड हिंगणघाट येथील हनुमान मंदिर जवळ नितीन तडस ,जावेद शेख उर्फ कालू ,योगेश नरड उर्फ जादू यांच्या सोबत बसून असता इरफान खान रशीद खान पठाण (मृतक )यास तू बहुत बडा भाई हो गया क्या ? तुने भुऱ्या को क्यू मारा ? असे म्हणून इरफान खान रशीद खान पठाण( मृतक) सोबत शिवीगाळ करून मारण्याची धमकी देऊन वाद-विवाद केला . इरफान खान रशीद खान पठाण (मृतकाने )त्याच्या खिशातील चाकू काढून हर्षल गिमेकर उर्फ भुऱ्या याला डालू क्या ? असे म्हटले असता हर्षल गिमेकर उर्फ भुऱ्या हनुमान मंदिर जवळ गेला व तेथून लोखंडी पाईप घेऊन मृतक याच्या डोक्यावर मारला व नितीन तडस , जावेद शेख उर्फ कालू ,योगेश नरड उर्फ जादू यांनी चाकू सारख्या धारदार शस्त्राने व दगडाने मृतक यांना जबर मारहाण करून जीवाने ठार मारले आरोपी विरोधात कलम 302 ,504, 506, 34 भादवी सहा गुन्हा नोंद करण्यात आला पुढील तपास हिंगणघाट पोलीस करीत आहे.