*राज्यशासन कृत मिळालेले’खावटी अनुदान’हे “राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदे”चे जिल्हाध्यक्ष रणजीत तडवी यांच्याहस्ते वितरित.

✒ ईसा तडवी ✒
मिडिया वार्ता न्युज
पाचोरा तालुका प्रतिनिधी
मो. 7666739067
कोरोना काळात लोकडाउन दरम्यान आदिवासी समुदायाच्या उपजीविका लक्षात घेऊन राज्यशासनानाने जाहिर केले होते.त्या अंतर्गत आज ११/८/२०२१ रोजी मिळालेले “खावटी अनुदान” हे नुकतेच पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी येथे वितरित करण्यात आले.सदर वितरित करण्यात आलेले खावटी अनुदान हे ५०%रोख स्वरुपात तसेच ५०%जीवनावश्यक वस्तु स्वरुपात वितरित करण्यात आले. सर्वात उल्लेखनीय आणि अभिनंदनीय बाब अशी की,हे खावटी अनुदान आदिवासी समाजासाठी नेहमीप्रमाने हितासाठी, कल्ल्याणासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून उपाशी पोटी राहून शासन दरबारी नेहमी आवाज उठवीणारे विशेषतः ‘रात्र ही वैरयाची आणि दिवास ही वैऱ्याचा’ याचे भान ठेऊन राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे जळगाव जिल्हाध्यक्ष रणजीत सुरेश तडवी यांच्या हस्ते आणि निगरानीमध्ये पार पडले.म्हणून रणजीत तडवी यांचे गाव आणि तालुका पातळीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.यावेळी गफुर तडवी जिल्हा कार्यकारी सदस्य, जाकीर तडवी ता सचिव मा उपसरपंच शेवाळे, भिकन तडवी व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.