“कोकण रिपब्लिकन सामाजिक संस्था” मार्फत पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप…!

✍गुणवंत कांबळे✍
मुंबई प्रतिनिधी
9869860530
मुंबई:- कोकण रिपब्लिकन सामाजिक संस्था च्या मार्फत कोकणातील दरडग्रस्त व पुरग्रस्तांचे मोडलेले संसार लवकरात लवकर उभे रहावे या दृष्टिकोनातून केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देताना बौध्दजन पंचायत समिती शाखा क्र-१४३.आंबेवाडी खार पूर्व, शाखा क्र- १६५. विलेपार्ले, शाखा क्र- ६६१. सायन, शाखा क्र-६६५ यांच्यावतीने जे मदतरुपी सहकार्य करण्यात आले होते ती मदत गुरुवार दि. १२-८-२१ रोजी खेड मधील पोसरे बौद्धवाडी मधील १६ बाधित कुटुंबातील सदस्यांना आलोरे येथे जाऊन देण्यात आली व या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच चिपळूण मधील माप, पेठमाप, गोवळकोट बौध्दवाडी, गोवळकोट ढवणनाका येथील कुणबी समाज बांधव यांच्या वसाहती मध्ये, तसेच चिपळूण शहरामध्ये पुराचे पाणी भरून नुकसान झालेल्या दुकानदार व स्थायिक रहिवाशी बांधवांना, खेड सुकीवली मधील बौध्द वस्तीत त्याचप्रमाणे महत्वाचे म्हणजे सद्यस्थितीत हातांवर पोट घेऊन जगणारे आणि अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंची नितांत गरज असणारे पोलादपूर शहरातील सडवली गावातील आदिवासी शाळेतील शिकत असणाऱ्या मुलांच्या कुटुंबांना जीवनावश्यक असलेले राशन किट्स, ब्लॅंकेट्स, मुलांसाठी खाऊ, महिलांसाठी साड्या इत्यादी मदत स्वरूपात देण्यात आले.
कोकण रिपब्लिकन सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाशजी मोरे यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली हा उपक्रम राबवताना कोकण रिपब्लिकन सामाजिक संस्थेचे चिटणीस सदानंद मोहिते, तसेच बबनभाई राजापकर, विलेपार्ले तालुका अध्यक्ष जितेंद्र साळवी, शैलेश कदम, त्याचप्रमाणे संस्थेचे चिपळूण तालुक्याचे संघटक सचिव राजुजी जाधव यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमाला उपस्थित असणारे बौ. पं. स. शाखा पदाधिकारी, संस्थेचे सदस्य, व वेळात वेळ काढून उपस्थिती दर्शवणारे इतर समाजबांधव आणि या कामी मार्गस्थ असलेल्या सर्वांचे उतरण्याची सोय आपल्या खेड भरणे येथील घरी करणारे पवार साहेब यांचे को. री. सा. स. संस्थेच्या वतीने या आभार व्यक्त केले.रिपब्लिकन सामाजिक संस्थेच्या वतीने कोकणावर आलेल्या अतिवृष्टीमुळे प्रभावित झालेल्या आपल्या परिवारास एकहात मदतीचा केलेल्या आवाहनाला भरभरून प्रतिसाद मिळाला. विविध विभागातून ज्या सदस्यांनी शाखांनी भरभरून मदत केली त्या सर्वांचे आभार व्यक्त केले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय मा.प्रकाश मोरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली तिसरी फेरी चिपळूणला रवाना झाली. सोबत संस्थेचे कोषाध्यक्ष बबन भाई राजापकर, मुख्य सचिव सदानंद मोहिते, जेष्ठ सदस्य शैलेश कदम,तालुका अध्यक्ष जितू साळवी, सदस्य प्रशांत जाधव, सदस्य विलास कांबळे (डाँन), दिनेश जाधव, यशवंत जाधव, दिपक जाधव, ईतर शाखांतील पदाधिकारी, यांच्या समवेत चिपळूण मध्ये दाखल झाल्यानंतर चिपळूण बहाद्दूरशेख नाक्यावर डाँ .बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले
तद्नंतर चिपळूनचे आमचे कोकण रिपब्लिकन सामाजिक संस्थेचे जेष्ठ संघटक रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील समाजसेवक आदरणीय राजूजी जाधव साहेब याच्या मार्गदर्शना खाली चिपळूण मधिल प्रभावित झालेल्या पेठमाप बौध्दवाडी नं १व पेठमाप बौध्दवाडी नं २ गोवळकोट गुरववडी तसेच खेड पोसरे बौध्दवाडीतील दरड कोसळून मृत झालेल्या आपल्या बांधवाना श्रध्दांजली वाहिली आणि ते ज्या संक्रमण शिबिरात राहतात त्या अलोरे येथे राजू जाधव यांच्या बरोबर जाऊन त्याची सांत्वन पर भेट घेतली त्यांना जीवनावश्यक मदतीचा हात दिला जीवनावश्यक वस्तूंचे किट ब्लँकेट साड्या व ईतर महिलांच्या आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
आदरणीय राजू जाधव यांचे याकामी मोलाचे सहकार्य लाभले त्याबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचे आभार मान्यात आले तसेच वाटप करण्या साठी आपले योगदान व वेळ दिलेल्या सर्वकार्यकारणी सदस्याचे आभार व्यक्त करण्यात आले.