मुंबईच्या बीडीडी चाळीचे पुनर्वसनाचे कार्य येत्या 10 दिवसात सुरु होणार गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची माहिती.

✒अभिजीत सकपाळ✒
ठाणे, भिवंडी प्रतिनिधी
9960096076
मुंबई,13 ऑगस्ट:- मुंबईतील बीडीडी चाळीचे पुनर्वसनाचे कार्य माघील अनेक दिवसा पासून रखडल आहे. त्यावर महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एक मोठी घोषणा केली आहे. ही घोषणा बीडीडी चाळ पुनर्वसनासंदर्भातली आहे. 1 जानेवारी 2021 पर्यंत जे नागरिक नायगाव बीडीडी चाळत राहत आहेत. ते सर्वजण सदनिका मिळण्यास पात्र असून अशा नागरिकांना 500 चौरस फुटांची सदनिका देण्यात येणार आहे. येत्या पुढील 10 दिवसात पहिल्या चार इमारतींचे काम सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा आव्हाड यांनी केली आहे. या पुनर्वसनासाठी सुमारे 400 लोकांचे स्थलांतर बॉम्बे डाईंग मिलमधील इमारतींमध्ये करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसंच ज्या लाभार्थींना तिथे जायचे नसल्यास त्यांना सरकारकडून 22 हजार रुपये प्रतिमाह भाडे देण्यात येईल, असं ते म्हणालेत.
या पुनर्वसन प्रकल्पासंदर्भात उर्वरित दोन सरकार निर्णय येत्या आठ दिवसात काढण्यात येणार असल्याचंही ते म्हणालेत. याव्यतिरिक्त पोलिसांच्या घरांबाबतही सकारात्मक निर्णय झाला असून पुढील 8 दिवसात त्याचाही सरकार निर्णय काढण्यात येणार असल्याची माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.
गुरुवारी नायगाव येथील ललित कला भवनला डॉ. आव्हाडांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, सरकार कोणालाही बेघर करणार नाही. नायगाव बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पाचे काम सुरू करण्याच्या निर्णयावर सरकार ठाम असल्याची ग्वाही त्यांनी नागरिकांना दिली. त्यामुळे कोणीही प्रकल्पात अडथळा आणू नये, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.